शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

मधुमेहावरील आयुर्वेदिक औषधाची निर्मिती

By admin | Updated: May 23, 2016 01:59 IST

जगभरात सर्व देशांमध्ये मधुमेहाच्या उपचारांविषयी चर्चा चालू असताना या आजारावरील आयुर्वेदिक औषधाची निर्मिती करण्यात यश आले आहे.

पुणे : जगभरात सर्व देशांमध्ये मधुमेहाच्या उपचारांविषयी चर्चा चालू असताना या आजारावरील आयुर्वेदिक औषधाची निर्मिती करण्यात यश आले आहे. केंद्र सरकारच्या काउंसिल आॅफ सायंटिफिक अ‍ॅण्ड इंडस्ट्रिीाल रिसर्च विभाग (सीएसआयआर- वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद) यांच्या वतीने पहिल्या डीपीपी ४ निरोधी उपक्रमासोबत मधुमेहावरील बीजीआर - ३४ अर्थात ब्लड ग्लुकोज रेग्युलेटर या आयुर्वेदिक औषधाची निर्मिती करण्यात आली आहे. मधुमेहाच्या टाईप २ साठी या औषधाची निर्मिती करण्यात आली असून औषधाचा प्रभावीपणा व सुरक्षितता यांची शास्त्रीयदृष्ट्या तपासणी करून ते आता रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती सीएसआयआर-नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. के. एस. रावत यांनी पत्रकार परिषदेत दिली. लखनऊ येथील नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, सेंट्रल इन्स्टिट्यूट आॅफ मेडीसिनल अ‍ॅण्ड अरोमटिक प्लँट्स यांच्या संयुक्त विद्यमाने या औषधाची निर्मिती करण्यात आली आहे. डीपीपी ४ निरोधींच्या तुलनेत बीजीआर - ३४ ची किंमतही पाच रुपयेइतकी असणार आहे, जी जगभरातील मधुमेहाच्या औषधांपेक्षा नाममात्र आहे, असेही ते यावेळी म्हणाले.सीएसआयआर- सेंट्रल इन्स्टिट्यूट आॅफ मेडीसिनल अ‍ॅण्ड अ‍ॅरोमटिक प्लँट्स (सीआयएमएपी)चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. डी. एन. मणी, सीएसआयआर- नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. संजीवकुमार ओझा, डी. वाय. पाटील आयुर्वेदिक महाविद्यालय व संशोधन केंद्राच्या उपप्राचार्या डॉ. मेधा कुलकर्णी व एआयएएमआयएल फार्मास्युटिकल्स इंडियाचे संचालक एस. पी. श्रीवास्तव उपस्थित होते. नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट आणि सेंट्रल इन्स्टिट्यूट आॅफ मेडीसिनल अ‍ॅण्ड अ‍ॅरोमटिक प्लँट्स यांनी एकत्रितपणे रुग्णांच्या गरजा ओळखत या टाईप २ मधुमेहावरील औषधाची निर्मिती केली आहे. यासाठी या दोन्ही संस्थांच्या शास्त्रज्ञांनी आयुर्वेदिक ग्रंथात सांगितलेल्या ५०० हून अधिक प्राचीन जडीबुटींवर संशोधन केले आहे. (प्रतिनिधी)