शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

डिसेंबरमध्ये कोल्हापुरात आयुर्वेद परिषद

By admin | Updated: October 17, 2014 00:34 IST

वनौषधी विद्यापीठ संस्थेचे यंदाचे रौप्यमहोत्सवी वर्ष

कोल्हापूर : येथील वनौषधी विद्यापीठ संस्थेचे यंदाचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त कोल्हापुरात १३ व १४ डिसेंबरला आठवी पॅनासिआ आंतरराष्ट्रीय आयुर्वेद परिषद दसरा चौकातील शाहू स्मारक भवन येथे आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेमध्ये आयुर्वेद, होमिओपॅथी, योग, वनौषधी, निसर्गोपचार, पर्यायी उपचारपद्धतीचे संशोधक सहभागी होणार असल्याची माहिती वनौषधी विद्यापीठाचे अध्यक्ष आयुर्वेदाचार्य डॉ. सुनील पाटील यांनी आज, गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.डॉ. पाटील म्हणाले, संस्थेच्यावतीने यापूर्वी मॉरिशस, मलेशिया, थायलंड, दुबई, सिंगापूर, श्रीलंका, सर्बिया अशा देशांत ही परिषद झाली आहे. डिसेंबरमध्ये होणाऱ्या या परिषदेमध्ये आयुर्वेदिक डॉक्टर्स, वैद्यक व्यवसायी, संशोधक, चिकित्सक, वनौषधी तज्ज्ञ, औषधीनिर्माण शास्त्र (फार्मसी) तज्ज्ञ, निसर्गोपचार तज्ज्ञ, होमिओपॅथी, योग, पर्यायी उपचारपद्धतीद्वारे वैद्यक व्यवसाय करणाऱ्यांचा सहभाग असेल.आयुर्वेदाच्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेल्या डॉक्टर्सना सन्मानित करण्यात येणार आहे. परिषदेमध्ये सहभागी होणाऱ्या आयुर्वेदाच्या विशेष सवलतीच्या शुल्कामध्ये सहभागी होऊन संशोधन प्रबंध किंवा पोस्टर प्रेझेंटेशन करता येणार आहे. अमेरिका जपान, आॅस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इटली, सर्बिया, फ्रान्स, मॉरिशस या देशांतील व भारतातील विविध राज्यांत आयुर्वेद संशोधन आणि चिकित्सा क्षेत्रात कार्यरत असणारे प्रतिनिधी सहभागी होणार असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. यावेळी डॉ. हृषिकेश जाधव, डॉ. हरिष नांगरे, शीतल देशपांडे, अश्विनी माळकर उपस्थित होते.