शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

आयाराम-गयारामांचे यशापयश

By admin | Updated: February 27, 2017 01:24 IST

निवडणुकीचे बिगुल वाजताच संधीच्या शोधात अनेक इच्छुक पक्षांतर करतात.

मुंबई : निवडणुकीचे बिगुल वाजताच संधीच्या शोधात अनेक इच्छुक पक्षांतर करतात. त्यांच्या प्रभागातील जनसंपर्कानुसार त्यांना तिकीट मिळते. पण सर्वच या जुगाडात नशीबवान ठरतातच असे नाही. या वेळी सर्वच मोठे पक्ष निवडणुकीच्या रिंगणात स्वतंत्र उतरल्याने इच्छुकांना अनेक पर्याय उपलब्ध झाले. यापैकी अनेकांनी सध्या चलतीत असलेल्या भाजपाला प्राध्यान्य दिले. भाजपाच्या तिकिटावर अनेकांना लॉटरी लागली, तरी काहींच्या पदरात अपयशच पडले.पालिका निवडणुकीत शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे स्वबळावर उतरले. या पक्षातील इच्छुकांच्या अपेक्षा वाढल्या आणि नाराजांच्याही. परिणामी, मोठ्या प्रमाणात बंडखोरी आणि पक्षांतर झाले. आजी-माजी नगरसेवक, काही माजी आमदारांनी पक्षांतर केले. काहींनी आपल्या पत्नीला तिकीट मिळण्यासाठी पक्षांतर केले. अशा २३पैकी १८ जण भाजपा आणि ५ शिवसेनेत गेले. भाजपात गेलेल्या १३ जणांना नगरसेवकपदाची लॉटरी लागली. शिवसेनेतील आयारामांचा पराभव झाला. (प्रतिनिधी)काँग्रेसमधील गयाराम ठरले लकीकाँग्रेसमधील गटातटांच्या राजकारणाला कंटाळून भाजपात गेलेल्या काँग्रेसवासींचे नशीब फळफळले. २०१४मधील भाजपाचे यश पाहून यापैकी अनेकांनी काँग्रेसमधून भाजपात उडी घेतली होती. काही दिवसांपूर्वीच भाजपा आणि शिवसेनेत उडी घेणारे आयाराम गयाराम कमनशिबी ठरले आहेत.नशीब जोरात२०१२मध्ये काँग्रेस नगरसेवक कमलेश यादव यांना पक्षाने तिकीट नाकारले. त्यामुळे २०१४मध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. गेली दोन वर्षे भाजपात असलेल्या यादव यांना पक्षाने यंदा उमेदवारी दिली. त्यांनी या संधीचे सोने केले. गेले २० वर्षे या प्रभागात भाजपाला स्थान मिळाले नव्हते. यादव यांच्या विजयाने प्रभाग क्रमांक ३१मध्ये कमळ फुलले आहे.काँग्रेसच्या माजी नगरसेविका जया तिवाना यांना पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी २०१४मध्ये भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांच्या या सबुरीचे फळ त्यांना या निवडणुकीत मिळाले आहे.शिवसेनेने नाकारल्याने भाजपात प्रवेश करणारे प्रभाकर शिंदे यांनाही पुन्हा एकदा नगरसेवक बनण्याचे स्वप्न साकार करता आले आहे. शिंदे यांनी सभागृह नेतेपद भूषवले आहे. त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभा निवडणूकही लढवली आहे.विजयी आयारामकाँग्रेसमधून भाजपात आलेले सागर सिंह ठाकूर, प्रीतम पंडागळे, कमलेश यादव, जया तिवाना, ऋजुता समीर देसाई, श्रीकला पिल्ले हे विजयी ठरले़ तर शिवसेनेतून भाजपात आलेले हर्षिता नार्वेकर, मकरंद नार्वेकर, प्रभाकर शिंदे यांना मतदारांनी कौल दिला़अपयशमनसेचे नगरसेवक भाजपात प्रवेश - प्रकाश दरेकर, शिवसेनेचे भाजपात जाणारे बबलू पांचाळ, तेजस्विनी आंबोले, मनसेचे माजी आमदार मंगेश सांगळे, माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर, मनसेचे चेतन कदम यांच्या पत्नी भारती कदम, भाजपाचे शिवसेनेत प्रवेश करणारे मंगल भानुशाली, मनसेचे नगरसेवक भालचंद्र आंबुरे, मुकेश कारिया हे अपयशी ठरले़