शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्यांनी केल्या बदल्या

By admin | Updated: April 7, 2017 03:11 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेतील प्रभाग अधिकाऱ्यासह सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा आदेश आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी सोमवारी काढला

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेतील प्रभाग अधिकाऱ्यासह सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा आदेश आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी सोमवारी काढला. यातील काही अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात बदल करुन काही जणांवर अतिरीक्त पदभार सोपविण्यात आला आहे.काशिमिरा हायवे पट्टा, हाटकेश, महाजनवाडी, पेणकरपाडा, घोडबंदर या परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे झाली असताना त्याकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष होत असल्याच्या अनेक तक्रारी आयुक्तांकडे आल्या होत्या. या प्रभाग कार्यालयाचे अधिकारी संजय दोंदे यांच्या या कारभारात दुटप्पीपणाची कारवाई केली जात असल्याच्या तक्रारींसह त्यांची भूमाफिया यांच्या समवेत झालेल्या चर्चेचे संवाद रेकॉर्डिंग करुन पिडीतांनी आयुक्तांना तक्रारींसोबत दिले होते. अखेर आयुक्तांनी त्याची दखल घेत दोंदे यांची प्रभाग कार्यालय सहा मधून उचलबांगडी केली. त्यांना जाहिरात विभागासह घनकचरा प्रकल्पातील दैनंदिन जमा होणाऱ्या कचऱ्याचे वजनकाट्याद्वारे मोजमाप तसेच कचरा गाड्यांच्या दैनंदिन फेऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. याच प्रभाग कार्यालयात सहायक अधिकारी म्हणून असलेले प्रकाश कुळकर्णी यांना याच प्रभागातंर्गत मुख्य शहरातील बेकायदा बांधकामांसह इतर महत्वाच्या प्रशासकीय कारभाराचे क्षेत्र सोपविण्यात आले आहे. तर उर्वरित काशिमिरा हायवे पट्टा, हाटकेश, महाजनवाडी, पेणकरपाडा, घोडबंदर आदी क्षेत्रातील बेकायदा बांधकामांसह दैनंदिन प्रशासकीय कारभारावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी प्रभाग अधिकारी अविनाश जाधव यांच्यावर सोपविण्यात आली आहे. जाधव यांची प्रभाग कार्यालय तीनमधून उचलबांगडी करुन त्यांना प्रभाग कार्यालय सहामध्ये बदली करण्यात आली आहे. स्थानिक संस्था कर विभागप्रमुख तसेच वाहनविभागाचे प्रमुख अधिकारी सुदाम गोडसे यांची प्रभाग कार्यालय तीनमध्ये बदली झाली आहे. त्यांच्याकडील वाहन विभागाचा अतिरीक्त कार्यभार लेखापरीक्षण विभागातील सहायक मुख्य लेखापरीक्षक चिंतामण शिंदे यांच्याकडे दिला आहे. (प्रतिनिधी)>दोंदे, जाधवांचा भोंगळ कारभारस्थानिक संस्था कर विभागाच्या प्रमुखपदी परिवहन विभागातील लेखाधिकारी म्हणून कार्यरत असलेले जनार्दन भासे यांची बदली करण्यात आली आहे. दोंदे, जाधव यांच्यासह इतर प्रभाग अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभारावर अंकुश ठेवून त्यांची मार्च महिन्यातच बदली करण्याचे आदेश आयुक्तांनी आस्थापना विभागाला दिले होते.