शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
2
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
3
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
4
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
5
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
6
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
7
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
8
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
9
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
10
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
11
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
12
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
13
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
14
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
15
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
17
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
18
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
19
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे

अयोध्याप्रश्नी नाशिकमध्ये लवकरच बैठक होणार

By admin | Updated: June 4, 2015 04:09 IST

अयोध्येतील राममंदिर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी नाशिकमध्ये याचिकाकर्त्यांना बोलावून बैठक घेण्यात येणार आहे. रामाच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या

नाशिक : अयोध्येतील राममंदिर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी नाशिकमध्ये याचिकाकर्त्यांना बोलावून बैठक घेण्यात येणार आहे. रामाच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या नगरीतच हा वाद मिटावा, यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती आखाडा परिषदेचे अध्यक्ष तथा निर्वाणी आखाड्याचे महंत ग्यानदास महाराज यांंनी दिली.अयोध्येत बाबरी मशीद उद्ध्वस्त झाल्यानंतर उच्च न्यायालयात या विषयाचा निवाडा करण्यात आला. तथापि, उच्च न्यायालयाने वादग्रस्त जागेचे त्रिभाजन करून जागा वाटपाची शिफारस केली. तथापि, त्यानंतर पुन्हा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या आहेत. यासंदर्भात वाद सोडविण्यासाठी महंत ग्यानदास यांनी अयोध्येत एक बैठक घेतली होती. तथापि, आता पुन्हा हा वाद सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. बाबरी मशिदीसाठी दावा करणारे मोहंमद हासीम अन्सारी आपले मित्र असून, त्यांना बोलाविल्यावर ते नाशिकमध्ये येतील, असे महंत ग्यानदास यांनी सांगितले. यापूर्वी आपण एक बैठक घेतली होती. त्यावेळी १६ याचिकाकर्त्यांपैकी दहा ते अकरा जण उपस्थित होते. आता मात्र तपोवनात साधुग्राममध्ये बैठक बोलाविण्यात येणार आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)