शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

अयाज सुल्तान गेला इसिसमध्ये?

By admin | Updated: January 6, 2016 02:08 IST

मालवणीतून ३० आॅक्टोबरपासून गायब असलेला अयाज सुल्तान हा २३वर्षीय तरुण थेट इसिसमध्ये सामील झाल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात येत आहे.

डिप्पी वांकाणी,  मुंबई मालवणीतून ३० आॅक्टोबरपासून गायब असलेला अयाज सुल्तान हा २३वर्षीय तरुण थेट इसिसमध्ये सामील झाल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणी अयाजविरुद्ध महाराष्ट्र एटीएसने गुन्हा दाखल केला असून, अयाज हा सध्या इसिसच्या अफगाणमधील गटात असल्याचेही सांगितले जात आहे. महाराष्ट्र एटीएसच्या सूत्रांनी सांगितले की, इसिसचे सहकार्य असलेल्या एका गटात अयाज सामील झाला असल्याचा संशय आहे. अयाजच्या मोबाइल रेकॉर्डवरून असे दिसून येते की, अयाजने मोबाइल फोनवरून इसिसशी संबंधित अनेक व्हिडीओ डाउनलोड केले होते. त्याच्या अन्य तीन सहकाऱ्यांनाही तो कट्टरपंथी बनविण्याच्या प्रयत्नात होता. अयाज हा इराकमध्ये दाखल होण्यासाठी इराणमार्गे गेला असावा असा अंदाज बांधला जात आहे. पण, आम्हाला असे वाटते की, तो अफगाणिस्तानमध्येच इसिसच्या गटात सहभागी झाला असावा. तो थेट सीरियातील युद्धात सहभागी झाला नसेल, असे एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले. या अधिकाऱ्याने असेही सांगितले की, इसिसने आपले गट पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात सक्रिय केले आहेत; तर अफगाणिस्तानात अल कायदाने इसिससोबत हातमिळवणी करीत अफगाणमधील अन्य गटासोबत लढण्याची तयारी केली आहे. अयाज अफगाणिस्तानात इसिसच्या अशाच एका गटात सहभागी झाला असल्याचा संशय आहे. त्यामुळे अयाज हा इसिसमध्ये भारताविरुद्धच्या आॅपरेशनमध्ये सहभागी झाला की काय? याबाबत निश्चित काही सांगता येणार नाही, असेही एका अधिकाऱ्याने सांगितले. अयाजला इसिसमध्ये सहभागी करून घेण्यामागे कोण आहे, असा प्रश्न उपस्थित केला असता या अधिकाऱ्याने सांगितले की, देश सोडून जाण्यापूर्वी अयाजने त्याच्या आॅनलाइन अ‍ॅक्टिव्हिटी थांबविल्या होत्या. तथापि, अयाजच्या संपर्कात कोण होते? याचा तपास आम्ही करत आहोत. एका अधिकाऱ्याने सांगितले की, अयाजविरुद्ध गुन्हा दाखल केला याचा अर्थ असा नाही की, तो दोषी आहे. वाजिद शेख आणि नूर मोहम्मद या दोघांनी सांगितले की, अयाज हा नेहमी इसिसबद्दलच बोलायचा. इसिसशी संबंधित व्हिडीओ दाखवायचा. तुम्ही दोघे लपून राहा, असा सल्लाही मोहसीननेच दिला होता, असेही या दोघांनी सांगितले. तर मोहसीन परतण्याची आम्ही वाट पाहत आहोत, असेही एका अधिकाऱ्याने सांगितले. अयाज परत येऊ इच्छित होताअरीब माजीदच्या बाबतीत पोलिसांनी तो परत आल्यानंंतरच गुन्हा दाखल केला. मात्र, अयाजविरुद्ध आताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अयाजच्या कुटुंबीयांचेही असे म्हणणे आहे की, अयाज परत येऊ इच्छित होता, पण पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.अयाज काबूलला अथवा इसिसमध्ये गेला नव्हता हे त्याने सिद्ध केले, तर आम्ही त्याला या गुन्ह्यातून मुक्त करू. दरम्यान, मोहसीन सय्यद हा तरुणही अद्याप फरार आहे. वाजिद शेख आणि नूर मोहम्मद हे दोघे तरुणही त्याच्यासोबत १५ डिसेंबरच्या दरम्यान गायब झाले होते. पण, या दोघांचे नाव इसिसशी जोडले गेल्याने हे दोघे लगेच परत आले.