शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अयाज सुल्तान ‘नॉट रिचेबल’

By admin | Updated: May 25, 2016 02:27 IST

मालवणी येथून गतवर्षी आॅक्टोबरमध्ये अफगाणिस्तानात पळालेला अयाज सुल्तान आता महाराष्ट्र एटीएसच्या तपासाच्या कक्षेच्याही बाहेर गेला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार

- डिप्पी वांकाणी,  मुंबई

मालवणी येथून गतवर्षी आॅक्टोबरमध्ये अफगाणिस्तानात पळालेला अयाज सुल्तान आता महाराष्ट्र एटीएसच्या तपासाच्या कक्षेच्याही बाहेर गेला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एसटीएस त्याच्यावर मार्चपर्यंत पाळत ठेवून होते. पण, एक महिन्याच्या दौरा-ए-आम या ट्रेनिंगनंतर तो सिरियात पोहोचला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अयाज सुल्तान हा प्रथम मुंबईहून दिल्लीला गेला. नंतर दिल्लीहून विमानाने काबुलला गेला. अफगाणिस्तानच्या डोंगराळ भागात त्याला शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देण्यात आले. अयाजनेच मालवणीच्या काही मित्रांना ही माहिती दिली. अतिरेकी संघटनात सहभागी होण्यासाठी अयाज या मित्रांना भडकावत होता. प्रशिक्षणानंतर अन्य काही लोकांसह त्याला सिरियात पाठविण्यात आले, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. अयाजने आपला फेसबुकचा आयडी बदलला होता आणि तो चॅटिंगही करत होता. तोपर्यंत आम्ही त्याच्यावर पाळत ठेवून होते. पण, आता तो कुठे आहे? काय करत आहे? हे आम्ही सांगू शकत नाही. कारण, त्याचा संपर्क तुटला आहे. प्रशिक्षण दिले गेले असले तरी त्याला युद्धात सहभागासाठी पाठविण्यात आलेले नाही, असेही एटीएसच्या सूत्रांनी सांगितले. तथापि, गुप्तचर विभागाकडे याबाबत काही नवीन माहिती असू शकते. हा तरुण कॉल सेंटरमध्ये काम करत होता. मागील वर्षी ३० आॅक्टोबरला तो घरातून निघून गेला. नूर मोहंमद, वाजीद शेख आणि मोहसीन शेख या तीन तरुणांच्याही तो संपर्कात होता. त्यांना घेऊन इसिसमध्ये सहभागी होण्याचा त्याचा डाव होता. यापैकी मोहसीनला अटक केली. वाजिद आणि नूर यांना एटीएस या प्रकरणात साक्षीदार बनवू पाहत आहे. अयाजने फेसबुकवर तीन आयडी बदलत मुंबईच्या मित्रांना इसिसचे व्हिडीओ पाठविले. अयाज चॅटिंगसाठी ट्रिलियन अ‍ॅप वापरत होता. मार्चपर्यंत एटीएस त्याच्यावर पाळत ठेवून होते. त्यानंतर तो संपर्काच्या बाहेर गेला. अयाजचा म्होरक्या यूसूफने त्याच्यावर आंतरराष्ट्रीय जबाबदारी सोपविली होती. चार तरुणांपैकी फक्त अयाजकडे पासपोर्ट होता.