शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत मंडळाचा अजब कारभार

By admin | Updated: May 17, 2016 01:49 IST

रास्ता पेठेतील विद्युत मंडळाच्या महावितरण आणि महापारेषण या एका संस्थेच्या दोन कंपन्यांनी लिफ्ट वाटून घेतली आहे़

पुणे : रास्ता पेठेतील विद्युत मंडळाच्या महावितरण आणि महापारेषण या एका संस्थेच्या दोन कंपन्यांनी लिफ्ट वाटून घेतली आहे़ त्यातील एक लिफ्ट बंद पडल्याने दुसऱ्या कंपनीने आपली लिफ्ट थेट आपल्या कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर थांबण्याची सोय करून घेतली आहे़ त्यामुळे महावितरण कंपनीच्या कार्यालयात जाणाऱ्यांना ज्येष्ठ नागरिक, महिला यांना जिन्याचा वापर करावा लागत आहे़ एका इमारतीतील दोन कंपन्यांच्या या अजब कारभाराचा लोकांना त्रास सहन करावा लागत आहे़ रास्ता पेठेतील तीन मजली इमारतीतील पहिल्या दोन मजल्यांवर महावितरणाचे कार्यालय आहे़ या ठिकाणी नागरिकांचे सर्वाधिक काम असते़ त्यामुळे येथे नेहमी लोकांचा राबता असतो़ तिसऱ्या मजल्यावर महापारेषणचे कार्यालय आहे़ या इमारतीत २ लिफ्ट आहेत़ त्यांपैकी महावितरणच्या लिफ्टची मुदत संपल्यामुळे ती अनेक महिन्यांपासून बंद आहे़ यामुळे इतके दिवस सर्व नागरिक दुसऱ्या लिफ्टचा वापर करीत होते़ त्यामुळे महापारेषणच्या लिफ्टवर त्याचा ताण आला़ तेव्हा ही लिफ्ट तळमजल्यावरून पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर न थांबता थेट तिसऱ्या मजल्यावर थांबेल, असा त्यात बदल करून घेण्यात आला आहे. त्यामुळे जिन्याचा वापर करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही़ महावितरणच्या लिफ्टची मुदत संपल्याने सध्या ती बंद आहे़ त्यासाठी निविदा काढण्यात आली होती; पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही़ पुनर्प्रक्रिया केली त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही़ आता नव्याने पुन्हा निविदा काढणार असल्याचे सूत्रांनी सांगितले़>दोन कंपन्यांमध्ये समन्वयाचा अभावपुणे जिल्हा विद्युत मंडळ समन्वयक समितीचे सदस्य चेतन आगरवाल यांनी सांगितले, की महावितरणला पुणे शहर हे सर्वांत जास्त महसूल देणारे असूनही जर मुख्य कार्यालयातच दोन कंपन्यांमध्ये समन्वय नसल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला अपंग व्यक्ती, कर्मचाऱ्यांना त्रास होत असेल; लिफ्ट बंद, पाणी बंद होत असेल तर त्याला जबाबदार कोण? त्यांच्यातच समन्वय नसेल तर नागरिकांना चांगली सेवा कशी देणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे़