शहरं
Join us  
Trending Stories
1
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
4
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
7
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
8
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
9
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
10
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
11
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
12
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
13
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
14
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
15
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
16
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
17
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
18
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
19
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
20
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस

शासनाचा अजब कारभार : तब्बल ६७ वर्षांपूर्वीचा भार-अधिभार निश्चित!

By admin | Updated: July 17, 2017 18:55 IST

पुणे, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर महापालिकेसह सातारा नगरपालिकेला विभागीय आयुक्तांकडून भार-अधिभार निश्चित झाल्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत

ऑनलाइन लोकमत

सांगली, दि. 17 : पुणे, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर महापालिकेसह सातारा नगरपालिकेला विभागीय आयुक्तांकडून भार-अधिभार निश्चित झाल्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तत्कालीन सांगली नगरपालिकेतील १९४९-५० च्या कालावधीपासूनचा म्हणजे ६७ वर्षांपूर्वीपासूनच्या प्रकरणांचा समावेश आहे. सांगलीला ९६ लाखांचा भार-अधिभार निश्चित केला आहे.राज्य शासनाने जुन्या प्रकरणांचा निपटारा करण्याची मोहीम सुरू केल्यानंतर शासकीय अधिकारी आणि शासनाच्या विभागांचा भोंगळ कारभार समोर आला आहे. जुन्या प्रकरणांचे धूळ साचलेले गठ्ठे उघडल्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनचीसुद्धा अनेक प्रकरणे प्रलंबित असल्याचे दिसून आले. सांगली नगरपालिका कालावधितील १९४९ ते १९९८ पर्यंतच्या प्रकरणांसाठी ९६ लाख ३० हजार ८३० इतका भार-अधिभार निश्चित केला आहे. राज्यातील पाच महापालिकांची एकूण भार-अधिभाराची रक्कम ही १० कोटी १९ लाख १० हजार ३३८ इतकी आहे. या सर्व महापालिकांच्या आयुक्तांना याबाबतची कल्पना देण्यात आली आहे. जुनी प्रकरणे असल्याने त्यासंदर्भातील कागदपत्रांचा शोध घेणे या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी एक दिव्य ठरणार आहे.

भार-अधिभाराचे हे प्रकरण आता नव्या शासनाने सत्वर निकाली काढावे, असे आदेश विभागीय आयुक्त कार्यालयाने बजावले आहेत. सांगली नगरपालिकेचाच विचार केला तर, इतक्या जुन्या प्रकरणांची कागदपत्रे सापडणे मुश्किल आहे. महापालिकेच्याच २० वर्षांच्या कालावधितील हजारो कागदपत्रे गहाळ झालेली आहे. त्यामुळे राज्यातील या पाचही महापालिकांकडील जुन्या कागदपत्रांच्या अस्तित्वाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महापालिका आयुक्तांनी आता या जुन्या कागदपत्रांचा शोध सुरू केला असून, प्रकरणनिहाय भार-अधिभार निश्चित करून त्यासंदर्भातील कार्यवाही आता सुरू होणार आहे. जुन्या प्रकरणांमुळे जबाबदार असणारे अनेक सदस्य हयात नाहीत. त्यामुळे पुढील कार्यवाहीसुद्धा रेंगाळण्याचीच चिन्हे आहेत.असा आहे भार-अधिभारमहापालिका प्रकरणे रक्कमपुणे ५९ ४ कोटी ९२ लाख ७२ हजार ८२५सातारा २१ १ कोटी ८ लाख ३८ हजार ८२५सांगली ३७ ९६ लाख ३0 हजार ८३0कोल्हापूर ६0 ९५ लाख ७८ हजार १0५सोलापूर ६६ २ कोटी २५ लाख ८९ हजार ७५२एकूण २४३ १0 कोटी १९ लाख १0 हजार ३३८नव्या प्रकरणांनाही पन्नास वर्षे लागणार!नगरपालिका कालावधितील भ्रष्टाचार व भार-अधिभाराकरिता लढणारे नागरिक हक्क संघटनेचे वि. द. बर्वे म्हणाले की, शासनाच्या या कारभाराने मी थक्क झालो. १९४९ मध्ये माझा जन्म झाला. आता सत्तरीच्या उंबरठ्यावर ही प्रकरणे पटलावर येत आहेत. २००६ ते २०१० या कालावधितील लेखापरीक्षणाच्या भार-अधिभाराविषयी मी तक्रार केली आहे. ती प्रकरणे कदाचित माझ्या मृत्यूनंतर ३० वर्षांनी पटलावर येतील, याची आता खात्री वाटत आहे.डोकेदुखी वाढणारमहापालिका आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनीही या आदेशानंतर प्रकरणांची शहानिशा करण्यास सुरुवात केली असल्याचे समजते. जुन्या प्रकरणांमुळे महापालिका अधिकाऱ्यांची डोकेदुखी आता वाढणार आहे.भार-अधिभार म्हणजे काय?एखाद्या संस्थेचे विशेष लेखापरीक्षण करून, गैरव्यवहाराबाबत अंतिम निष्कर्ष काढून संबंधित लेखा विभागाकङून लेखापरीक्षण कालावधीतील गैरव्यवहाराची प्रकरणे एकत्रित करून त्याची एकूण रक्कम काढली जाते. एकूण गैरव्यवहाराच्या रकमेची जबाबदारी निर्णयप्रक्रियेतील सदस्य किंवा अधिकारी, कर्मचारी यांच्यावर निश्चित केली जाते, त्यास भार-अधिभार असे म्हणतात. हा अधिभार पुन्हा संबंधित प्रकरणांना जबाबदार असलेल्या लोकांमध्ये विभागला जातो आणि त्यानंतर वसुलीच्या प्रक्रियेला सुरुवात होते.