शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
2
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
3
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
4
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
5
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
7
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
8
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
9
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
10
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
11
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
12
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
13
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
14
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
15
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
16
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
17
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
18
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
19
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
20
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?

आषाढ आला़ - उल्हास संचारला, पण उत्साह मावळला!

By admin | Updated: July 4, 2016 20:02 IST

पावसाचा खेळ..., धरतीवर हिरवागार गालिचा पसरलेला..., बोटभर, इतभर वाढलेलं गवतपाला चरणारी गुरंढोरं, ओढ्या-नाल्यातील खाचखळग्यात पावसाचं पाणी साठलेलं

प्रभु पुजारी

सोलापूर, दि. ४ :  पावसाचा खेळ..., धरतीवर हिरवागार गालिचा पसरलेला..., बोटभर, इतभर वाढलेलं गवतपाला चरणारी गुरंढोरं, ओढ्या-नाल्यातील खाचखळग्यात पावसाचं पाणी साठलेलं, सारा निसर्ग हिरवाईनं नटलेला़ असा अद्भुत नजारा सृष्टीला प्रदान करणाऱ्या आषाढ महिन्यास आजपासून प्रारंभ होत आहे़ कवी कालिदासांच्या शब्दकुंचल्यातून अवतरलेला मेघ आज आभाळात फिरतो आहे, पळतो आहे़ पळणाऱ्या मेघांची दाटी पाहून जीव आणि नेत्र जरी सुखावले असले तरी धरणीमातेची तहान मात्र भागलेली नाही़ तुरळक पावसाच्या सरीने सर्वत्र रानगवत उगवले आहे़.

आषाढातील जोरदार वाऱ्यामुळे हे गवत खुशीने डोलत आहे़ रानफुले डुलत आहेत, पण काही ठिकाणी पेरण्या खोळंबल्या आहेत़ काही ठिकाणी पेरण्या झाल्या, मात्र अंकुर उगवून येताच पीक कोमेजून जात आहे़.

 परिणामी शेतकरी चिंतेत आहेत़ काळ्याकुट्ट ढगांच्या शर्यतीमुळे धरतीवर ऊन-सावलीचा खेळ सुरू आहे़ ह्यआभाळ भरून येतंय पण वारं त्याला पुढं नेतंय अशी परिस्थिती आज झाली आहे़ अस्सल ग्रामीण शेतकऱ्याच्या भाषेत बोलायचं तर ह्यहे ढग, हे मेघ, वांझोट झालं आहेह्ण अशी प्रतिक्रिया उमटत आहे़ आषाढाच्या आगमनाने सर्वत्र उल्हास जरी संचारला असला तरी उत्साह मात्र मावळलेलाच आहे़ संपूर्ण जिल्हा आणखी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे़.

ही प्रतीक्षा लवकर संपावी म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एकवटलेला वारकरीसुद्धा पांडुरंगाकडे साकडे घालत आहे़ आज जरी कालिदासांच्या कुंचल्यासारखा मेघ बरसत नसला तरी बळीराजाच्या आशा मात्र जिवंत आहेत़ जर मेघ बरसला तरच आषाढाच्या या उल्हासात उत्साहाचा भर पडेल अन् अवघी सृष्टी विठ्ठलनामाच्या जयघोषात लीन होईल़