शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
3
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
4
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
5
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
6
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
7
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
8
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
9
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
10
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
11
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
12
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
13
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
14
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
15
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
16
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
17
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
18
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
19
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
20
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 

प्रबोधन सूर्याचा अस्त!

By admin | Updated: February 22, 2015 02:37 IST

कष्टकरी जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारा लढवय्या कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पार्थिवावर शनिवारी सायंकाळी येथील पंचगंगा मुक्तिधाममध्ये कोणताही धार्मिक विधी न करता अंत्यसंस्कार करण्यात आले.

लाल सलाम : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या अंत्यदर्शनासाठी कोल्हापुरात अलोट गर्दीकोल्हापूर : महाराष्ट्राच्या डाव्या व पुरोगामी चळवळीतील पितामह आणि सर्वसामान्य कष्टकरी जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारा लढवय्या कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पार्थिवावर शनिवारी सायंकाळी येथील पंचगंगा मुक्तिधाममध्ये कोणताही धार्मिक विधी न करता अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्यभरातून आलेल्या हजारो कार्यकर्त्यांनी आपल्या या लाडक्या नेत्याला अखेरचा सलाम केला. मावळत्या सूर्याच्या साक्षीने प्रबोधनाच्या चळवळीतील सूर्यही लुप्त झाला. अंत्यसंस्कारास जमलेल्या हजारो कार्यकर्त्यांनी मुठी आवळल्या. ‘कॉम्रेड गोविंद पानसरे को लाल सलाम़़़ लाल सलाम’ अशी आरोळी दिली. आपले लाडके अण्णा आता पुन्हा कधीच भेटणार नाहीत, या भेसूर सत्याने अनेकांचा अश्रंूचा बांध फुटला. १६ फेब्रुवारीला कोल्हापुरात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात कॉ. पानसरे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या शरीरात तीन गोळ्या घुसल्या होत्या. कोल्हापुरात उपचार केल्यानंतर शुक्रवारी त्यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात हलविण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांची शुक्रवारी रात्री प्राणज्योत मालवली. पानसरे यांच्या निधनाची बातमी येथे पोचली व अवघे कोल्हापूर शोकसागरात बुडाले. सकाळी त्यांचे पार्थिव कोल्हापूरला नेण्यात आले. गेली ६५ वर्षे कोल्हापूरसह राज्यातील रस्त्यांवर संघर्ष करणारा आपला नेता निस्तेज पडलेला पाहून जनसमुदायाला हुंदका आवरता आला नाही.सरकारी अनास्थेचा कळसकॉ. पानसरे यांचे पार्थिव शनिवारी सकाळी ब्रीच कॅण्डी हॉस्पिटलमधून मुंबई विमानतळावर आणण्यात आले, पण तिथे जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांच्याव्यतिरिक्त कोणताही सरकारी अधिकारी उपस्थित नव्हता. शिवाय जवळपास एक तास पार्थिव विमानतळावरच रखडले. स्क्रिनिंगसाठी पैसे मागितले गेले. हा सगळा प्रकार संतापजनक होता, असे आमदार कपिल पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले.महाराष्ट्र बंदची हाककॉ. पानसरे यांच्या निधनानंतर भाकपासह सर्व डाव्या संघटनांनी उद्या, रविवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं, भारिप-बविआ, स्वाभिमानी शेतकरी संघटना आदी राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे.खास विमानाने पार्थिव कोल्हापुरातकॉ़ पानसरे यांचे पार्थिव दुपारी साडेबाराला खास विमानाने कोल्हापुरातील उजळाईवाडी येथे आणण्यात आले. तेथून पालकमंत्री चंद्रकांत पाटील व भाकपाचे नेते भालचंद्र कांगो यांनी दसरा चौकात पार्थिव आणले. भाकपाचे राष्ट्रीय महासचिव क ॉम्रेड सुधाकर रेड्डी, सहसचिव शमी फैजी, कांगो यांनी पानसरे यांच्या पार्थिवावर पक्षाचा लाल ध्वज घातला. - विशेष पान/१०अंत्ययात्रा नव्हे, संघर्षयात्रा!दुपारी सव्वातीनला अंत्ययात्रा सुरू झाली. हातात लाल ध्वज घेतलेले असंख्य कार्यकर्ते त्यात सहभागी झाले होते. पक्षाच्या नेत्यांनी ही अंत्ययात्रा नव्हे, तर एक संघर्षयात्रा असेल, असे जाहीर केले. या अंत्ययात्रेत आणि त्यानंतरच्या शोकसभेत सर्वच वक्त्यांनी मारेकऱ्यांना पकडण्यात राज्य सरकारला अपयश आल्याने मुख्यमत्री फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. सायंकाळी सव्वासहा वाजता पानसरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पानसरे यांच्या कन्या स्मिता आणि सून मेघा यांनी चितेला मुखाग्नी दिला.व्यवस्थेवरचा हल्ला कॉ. पानसरेंवरील हल्ला हा कोणा व्यक्ती वा विचारांवर नसून, तो व्यवस्थेवरचा हल्ला व आव्हान आहे. हे आव्हान मोडीत काढण्यास सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.