शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत शेतकऱ्यांचा जागरण गोंधळ

By admin | Updated: June 7, 2017 01:31 IST

बारामती प्रांत कार्यालयासमोर जागरण गोंधळ करून अभिनव पद्धतीने आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : शेतकरी संपाच्या सहाव्या दिवशी शेतकरी क्रांती मोर्चाच्या वतीने बारामती प्रांत कार्यालयासमोर जागरण गोंधळ करून अभिनव पद्धतीने आंदोलन करण्यात आले. या वेळी आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांना कर्जमाफीसाठी साकडे घातले. तसेच, आंदोलकांनी प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय यासह इतर महत्त्वाची शासकीय कार्यालये असलेल्या मध्यवर्ती शासकीय कार्यालयाच्या इमारतीच्या प्रवेशद्वाराला टाळे ठोकले.शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संंपानंतर बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार ठप्प झाले आहेत. शहरात भाज्यांचे दर तिपटीने वाढले आहेत. बारामती शहर, तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. रविवारी शहर आणि तालुक्यात पुकारलेल्या कडकडीत बंदनंतर सोमवारी (दि.६) शेतकरी क्रांती मोर्चाच्या वतीने बारामती शहरातील शासकीय मध्यवर्ती कार्यालयाच्या इमारतीसमोर जागरण गोंधळ घालण्यात आला. सकाळी १०.३० वाजता सुरू झालेले हे आंदोलन बारामतीकरांच्या चर्चेचा विषय ठरले. सुरुवातीला मध्यवर्ती कार्यालय इमारतीला टाळे ठोकून सदर आंदोलन सुरू केले. या वेळी आंदोलकांनी जागरणातील गोंधळी गीतांच्या माध्यमातून सरकारकडे शेतकऱ्यांच्या मागण्या मांडण्यात आल्या. हातात संंबळ, तुणतुणे आदी वाद्यांच्या गजरात गोंधळींच्या वेषात या वेळी लोटांगण घालण्यात आले. मळवट भरून सहभागी झालेले आंदोलकांमुळे प्रत्यक्षात जागरण गोंधळ नागरिकांनी अनुभवले.आंदोलकांनी दगडाला मळवट भरून मुख्यमंत्री बनवून या दगडापुढे सवाद्य गोंधळ घातला. काही आंदोलकांनी अंगात देव आल्याचे नाट्य रंगविले.पंचायत समितीचे माजी सभापती करण खलाटे, संभाजी होळकर, अ‍ॅड. सचिन वाघ, जितेंद्र काटे आदींनी आंदोलनात सहभाग घेतला. आंदोलकांना पोलिसांनी पोलीस ठाण्यात आणून प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना नोटिसा देऊन सोडून देण्यात आले.>शासकीय कार्यालयांना टाळे : व्यवहार बंदपुणे : मंगळवारी शेतकऱ्यांनी आपला मोर्चा शासकीय कार्यालयांकडे वळविला. ठिकठिकाणी कार्यालयांना प्रतीकात्मक स्वरूपात टाळे ठोकण्यात आले. काही ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहनही करण्यात आले. आजही बहुतांश ठिकाणी आठवडेबाजार बंद ठेवण्यात आले होते. तालुका कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे व्यवहार आजही बंद होते. घोडेगाव येथे शेतकरी कर्जमाफीसाठी तहसील कार्यालयाला प्रतीकात्मक टाळेठोक आंदोलन झाले. शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. सासवड नगरपालिका व पंचायत समितीला शेतकऱ्यांनी मंगळवारी टाळे लावले. वाघोली येथील आठवडेबाजार सकाळी भरलाच नाही. भोर शहरात शेतकरी व व्यापारी माल घेऊन न आल्याने ग्राहकांना परत जावे लागले. मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती आजही पूर्णपणे बंद होती.