शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

एमएमसीची निवडणूक घेण्यास टाळाटाळ

By admin | Updated: July 24, 2016 03:21 IST

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या (एमएमसी) कार्यकारिणीचा कालावधी मेमध्ये संपूनही सरकार निवडणूक घेण्यास टाळाटाळ करत आहे. निवडणूक घेण्याऐवजी सरकार हा कारभार एका

मुंबई : महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या (एमएमसी) कार्यकारिणीचा कालावधी मेमध्ये संपूनही सरकार निवडणूक घेण्यास टाळाटाळ करत आहे. निवडणूक घेण्याऐवजी सरकार हा कारभार एका रजिस्ट्रारवर चालवत आहे, हे निदर्शनास येताच उच्च न्यायालयाने सरकारची चांगलीच खरडपट्टी काढली. निवडणूक केव्हा जाहीर करणार? अशी विचारणा करत उच्च न्यायालयाने एका आठवड्यात यासंदर्भात माहिती देण्याचे निर्देश सरकारला दिले.एमएमसीच्या कार्यकारिणीचा कालावधी संपुष्टात येण्यापूर्वीच इंडियन मेडिकल असोसिएशन (महाराष्ट्र) आणि एमएमसीने राज्य सरकारशी पत्रव्यवहार करून निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याची विनंती केली. मात्र सरकारने प्रतिसाद दिला नाही. मे २०१६मध्ये कार्यकारिणीचा कालावधी संपुष्टात आला, तरीही राज्य सरकारने निवडणुकीकडे दुर्लक्ष केले. निवडणूक जाहीर करण्याऐवजी सरकारने एमएससीचा कार्यभार पाहण्यासाठी रजिस्ट्रारची नियुक्ती केली. राज्य सरकार निवडणूक घेण्यास टाळाटाळ करत आहे. राज्य सरकारने रजिस्ट्रारला निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी करणारी याचिका इंडियन मेडिकल असोसिएशनने (महाराष्ट्र) उच्च न्यायालयात दाखल केली आहे. राज्य सरकार निवडणूक घेण्यास टाळाटाळ का करत आहे? अशी विचारणा संतप्त होत उच्च न्यायालयाने सरकारकडे केली.‘कार्यकारिणी न नेमता एखाद्या व्यक्तीच्या हातात कारभार सोपवणे अत्यंत धोकायदायक आहे. यामध्ये कोणाचा तरी डाव असू शकतो. यात राजकारणही असू शकते. प्रलंबित असलेल्या चौकशीची कागदपत्रे असतात किंवा गुंतवणुकीसंदर्भातील फाईल्स व कागदपत्रे असतात. कोणीतरी याचा गैरफायदा घेऊ शकतो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीवर कारभार सोपविण्याऐवजी निवडणूक घ्या,’ असे उच्च न्यायालयाने सरकारला बजावले. (प्रतिनिधी)आठवडाभरात माहिती द्या- निवडणूक प्रक्रिया केव्हा सुरू करणार? याची माहितीही एका आठवड्यात देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले.- राज्य सरकार निवडणूक घेण्यास टाळाटाळ का करत आहे? अशी विचारणा संतप्त होत उच्च न्यायालयाने सरकारकडे केली.