शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विमानवारीसाठी साहित्यिक ‘प्रचंड आशावादी’

By admin | Updated: November 14, 2014 00:51 IST

गेले काही वर्ष विश्व साहित्य संमेलन झालेच नाही. त्यामुळे विदेशात विमानाने जाण्याची साहित्यिकांची संधी हुकली. यंदाचे साहित्य संमेलन पंजाबच्या घुमान येथे होणार आहे. साहित्यिकांचा वेळ वाचावा

कमी खर्चात घुमानला जाणार विमान : कंपनीशी बोलणी सुरू राजेश पाणूरकर - नागपूरगेले काही वर्ष विश्व साहित्य संमेलन झालेच नाही. त्यामुळे विदेशात विमानाने जाण्याची साहित्यिकांची संधी हुकली. यंदाचे साहित्य संमेलन पंजाबच्या घुमान येथे होणार आहे. साहित्यिकांचा वेळ वाचावा आणि कमी खर्चात साहित्यिकांना जास्तीतजास्त संख्येने घुमानच्या साहित्य संमेलनात सहभागी होता यावे म्हणून भोपाळ, नागपूर, पुणे येथून विशेष विमाने सोडण्यात येणार आहेत. त्यापैकी पुण्यातून एक विशेष विमान घुमानसाठी निश्चित करण्यात आले आहे. नागपूर आणि भोपाळ येथूनही घुमानसाठी थेट विशेष विमान सोडण्यात यावे म्हणून प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे घुमानच्या साहित्य संमेलनाला उपस्थित राहू इच्छिणाऱ्या साहित्यिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून भोपाळ आणि नागपूर येथूनही विशेष विमानाची सोय करण्यात येईल, याबाबत साहित्यिक ‘प्रचंड आशावादी’ आहे. साहित्य संमेलनाच्या आयोजन समितीने नुकतीच ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. रसिक आणि कलांवर प्रेम करणाऱ्या शरद पवार यांनी संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. त्यांनी पुण्यातून एक विमान घुमानसाठी विशेषत्त्वाने निश्चित केले आहे. यामुळे पुणे आणि परिसरातील साहित्यिक, रसिक तसेच साहित्य महामंडळाचे पदाधिकारी थेट विमानाने घुमानला पोहोचणार आहेत. या पार्श्वभूमीवर संमेलनाच्या आयोजन समितीत महत्त्वाची भूमिका असणाऱ्या गिरीश गांधी यांनीही नागपुरातून विशेष विमान घुमानसाठी सोडण्याची तयारी चालविली आहे.विदर्भ साहित्य संघाचे पदाधिकारी, विदर्भातील रसिक यांना घुमानला विमानाने कमी वेळात आणि कमी खर्चात पोहोचता यावे. हा उद्देश यामागे आहे. त्यासाठी विमान कंपन्यांशी गिरीश गांधी यांची बोलणी सुरू असून यासंदर्भात योजना करण्यासाठी गिरीशभाऊ थेट दिल्लीत पोहोचले आहेत. संमेलनाचे आयोजक भारत देसडला, संजय नहार यांची दिल्लीत भेट घेऊन गिरीश गांधी यांनी नागपुरातून संमेलनासाठी विशेष विमान सोडण्यात यावे, यासाठी प्रभावी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांच्या या प्रयत्नाला यश यावे म्हणून सारेच साहित्यिक आणि संमेलनाला जाऊ इच्छिणारे रसिक प्रार्थना करीत आहेत. भोपाळ येथूनही मराठी रसिक या संमेलनाला जाण्यासाठी इच्छूक असून रसिकांची संख्या पाहता भोपाळमधूनही विशेष विमानाची सोय करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे कळले. एकूणच घुमानच्या साहित्य संमेलनाला जाण्यासाठी यंदा चांगलाच उत्साह असून संत नामदेवांच्या नगरीत साहित्यिक रसिकांचे स्वागत करण्यासाठी आयोजकही उत्सुक आहेत.