शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

आॅगस्टमध्ये सरासरी कमीच

By admin | Updated: August 26, 2015 02:27 IST

मंगळवारी मुंबईसह उपनगरांत पावसाने दमदार हजेरी लावली असली तरीदेखील आॅगस्ट महिन्यात सरासरीच्या तुलनेत कमी पावसाची नोंद झाली आहे. आॅगस्ट महिन्यात पावसाची

मुंबई : मंगळवारी मुंबईसह उपनगरांत पावसाने दमदार हजेरी लावली असली तरीदेखील आॅगस्ट महिन्यात सरासरीच्या तुलनेत कमी पावसाची नोंद झाली आहे. आॅगस्ट महिन्यात पावसाची सरासरी नोंद ५२९.७ मिलीमीटर अपेक्षित असते. परंतु यावर्षी ही नोंद १०९.७ मिलीमीटर एवढीच झाल्याचे स्कायमेटने म्हटले आहे.जून महिन्यात पावसाने मुंबईत जोरदार खाते उघडले. जून महिन्यात साधारणत: ५२३ मिलीमीटर एवढा पाऊस पडतो. यावर्षी जून महिन्यात मुंबईत १ हजार १७४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. ही आतापर्यंतची सर्वाधिक नोंद आहे. तर जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावसाचा जोर ओसरला. जुलै महिन्यात मुंबईत सरासरी ८०० मिलीमीटर पाऊस पडतो. परंतु यावेळी जुलै महिन्यात केवळ ३५९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.सांताक्रूझ वेधशाळेत आॅगस्ट महिन्यात १०९.७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. प्रत्यक्षात आॅगस्ट महिन्यात पावसाची सरासरी नोंद ५२९.७ मिलीमीटर एवढी असते. नोंदीनुसार ६ आॅगस्टला २२ मिमी, १७ आॅगस्टला १२ मिमी आणि १८ आॅगस्टला ११ मिमी पाऊस पडला आहे. पश्चिम किनारा आणि मुंबईत कमी दाबाच्या पट्टयामुळे मुंबईत चांगला पाऊस पडतो. परंतु या कालावधीत या ठिकाणी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले नाही. परिणामी पावसाचा जोर ओसरला, असे स्कायमेटचे म्हणणे आहे.