शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
4
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
5
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
6
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
7
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
8
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
9
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
10
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
11
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
12
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
13
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
14
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
15
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
16
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
17
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
18
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
19
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
20
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू

‘निल बटे सन्नाटा’ सरासरी तर ‘जंगल बुक’ सुपरहिट

By admin | Updated: April 26, 2016 02:55 IST

गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या नील बटे सन्नाटा या चित्रपटाला समीक्षकांनी गौरविले, तसेच जंगल बुक चित्रपटाची वाटचाल सुपरहिटकडे झाली

गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या नील बटे सन्नाटा या चित्रपटाला समीक्षकांनी गौरविले, तसेच जंगल बुक चित्रपटाची वाटचाल सुपरहिटकडे झाली. नील बटे... या चित्रपटाने लालरंग, संता-बंता या चित्रपटांपेक्षा सर्वाधिक १.७५ कोटींची कमाई केली. प्रेक्षकांच्या सकारात्मक प्रतिक्रियांमुळे या चित्रपटाला आणखी प्रेक्षक मिळतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि इतर अनेक राज्यांत करमुक्त झाल्याचाही या चित्रपटाला फायदा झाला. तर नव्या चित्रपटांपैकी कोणताही चित्रपट बॉक्स आॅफीसवर टिकू शकला नाही. रणदीप हुड्डाच्या चित्रपट लाल रंगने पहिल्या तीन दिवसांची कमाई १.७५ कोटी रुपयेकेली. आकाशदीप दिग्दर्शित संता-बंता प्रा.लि.ची अवस्था वाईट झाली. हा चित्रपट पहिल्या तीन दिवसांत केवळ ५५ लाख रुपये कमवू शकला. मुंबईसह अनेक शहरांत या चित्रपटावर सरकारने बंदी घातली आहे. शीख समुदायाचा एक गट या चित्रपटाला विरोध करीत होता. पंजाबमध्ये संता-बंतावर बंदी घालण्यात आली.यापूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांबाबत बोलायचे झाले, तर यशराज निर्मित शाहरुख खानच्या चित्रपट फॅनला अपयशाचे धनी व्हावे लागले. पहिल्या १० आठवड्यांत या चित्रपटाने ८० कोटींच्या आसपास जरूर व्यवसाय केला, मात्र शाहरुख खानचा चित्रपट असल्याच्या दृष्टीने याला खूप चांगला व्यवसाय म्हणता येणार नाही. दिलवालेनंतर शाहरुख खानला हा दुसरा धक्का आहे. बॉक्स आॅफीसवर सध्या एकच चित्रपट धूम करीत असून, तो म्हणजे जंगल बुक. १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत १४५ कोटी रुपयांहून अधिक व्यवसाय केला असून, तो हॉलीवूडच्या भारतात प्रदर्शित चित्रपटांत सर्वाधिक मानला जात आहे. या चित्रपटाला आजही प्रेक्षकांची गर्दी आहे. येणाऱ्या शुक्रवारी जॅकी श्रॉफचा मुलगा टायगरचा दुसरा चित्रपट बागी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूर त्याची नायिका आहे. टायगरचा हीरोपंती चित्रपट बनविणाऱ्या शब्बीर खान यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. निर्माता साजिद नाडियादवाला यांनी बागीचा जोरदार प्रचार केला असून, अ‍ॅक्शन आणि रोमान्स असलेल्या या चित्रपटाकडून बॉलीवूडला खूप अपेक्षा आहेत.