शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बीएस ६ मानकाचे इंधन पंपांवर झाले उपलब्ध; रस्त्यावर धूरमुक्त वाहने धावणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2020 06:36 IST

प्रदूषणकारी सल्फर १० मिलिग्रॅमपर्यंत घटविले

संतोष भिसे सांगली : बीएस ६ मानकाची वाहने रस्त्यावर येताच राज्यभरात बीएस ६ श्रेणीचे इंधनही उपलब्ध झाले आहे. धुराला कारणीभूत सल्फर नव्या इंधनात पाचपटींनी कमी झाले आहे. यामुळे नवी वाहने धूरमुक्त असतील.

इंधन कंपन्यांनी १ एप्रिलपासून बीएस ६ इंधन उपलब्ध होईल, असे जाहीर केले आहे. प्रत्यक्षात जानेवारीपासूनच या श्रेणीचे पेट्रोल उपलब्ध झाले, विक्री मात्र बीएस ४ म्हणूनच सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रात डिझेलचे बीएस ४ ते बीएस ६ हे स्थित्यंतर फेब्रुवारीपर्यंत कंपन्यांनी पूर्ण केले. हिंदुस्थान पेट्रोलियमने मुंबईत रसायनी येथील रिफायनरीपासून पाईपलाईनद्वारे बीएस ६ इंधन सांगलीत हजारवाडी, सोलापूर, पुणे आदी डेपोंना पुरविले. त्यासाठी कट अॉफ डेट निश्चित केली. दोन दिवसांचा शंटिंग पिरीयड ठेवला. या कालावधीत बीएस ४ बंद करून बीएस ६ प्रवाहित केले. या प्रक्रियेत जुने व नवे इंधन अत्यल्प प्रमाणात मिक्स झाले. पंपांना व ग्राहकांना मात्र बीएस ४ म्हणूनच पुरविले. एका अर्थाने ग्राहकांना जुन्या किमतीतच उच्च दर्जाचे इंधन मिळाले. भारत पेट्रोलियमने पंपांच्या टाक्यांमध्ये ३०० ते ५०० लिटरचा जुन्या इंधनाचा किमान स्टॉक ठेवून नवे इंधन भरले. बारा हजार लिटर क्षमतेच्या टाक्यांमध्ये अवघे तीन-पाचशे लिटर जुने इंधन मिसळले गेले. मात्र त्यामुळे फारसा फरक जाणवला नाही.सल्फर १० मिलिग्रॅमपर्यंतइंधनातील सल्फरच्या ज्वलनातून कार्बन मोनोक्सॉईड, कार्बन डायअॉक्साईड, हायड्रो कार्बन आणि नायट्रोजन आॅक्साईड हे वायू बाहेर पडतात. बीएस ४ श्रेणीमध्ये एक किलो इंधनात ५० मिलिग्रॅम सल्फर असायचे. बीएस ६ श्रेणीत ते पाचपटींनी कमी करून १० मिलिग्रॅमपर्यंत ठेवले आहे. त्यामुळे ज्वलनानंतर घातक वायूंचे प्रमाणही पाचपटींनी कमी होणे अपेक्षित आहे. एका अर्थाने नवी वाहने धूरमुक्त असतील.बीएस ६ इंधनाचे फायदेसल्फर नीचांकी स्तरावर, त्यामुळे धूरमुक्त वाहने. चांगल्या ज्वलनांकामुळे वाहनांची ताकद तथा अ‍ॅव्हरेज वाढण्याचा दावादोन महिन्यांपासूनच बीएस ६ इंधनाची विक्री करत आहोत. अधिकृतरित्या १ एप्रिलपासून जाहीर होईल. या बदलासाठी जानेवारी ते एप्रिलपर्यंतचा कालावधी मिळाला. सध्या नव्या श्रेणीचे डिझेल-पेट्रोल उपलब्ध आहे. - श्रीरंग केळकर, सत्यजित पाटील, वितरक, सांगली

टॅग्स :Petrolपेट्रोलcarकार