शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही; मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
2
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
3
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
4
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
5
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
6
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
7
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
8
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
9
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
10
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
11
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
12
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
13
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
14
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
15
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
16
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
17
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
18
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
19
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
20
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 

काजव्यांचा विलोभनीय प्रकाशोत्सव

By admin | Updated: May 28, 2017 01:02 IST

राधानगरीत पर्यटकांची गर्दी : पावसाळ्यापर्यंत चालणार रोज ‘काजवा महोत्सव’

संदीप आडनाईक ।  लोकमत न्यूज नेटवर्क -कोल्हापूर : राधानगरी-काळम्मावाडीच्या जंगल परिसरात शुक्रवारी (दि. २६) सायंकाळपासून रात्रीपर्यंत राज्यातून आलेल्या पर्यटकांनी विविध झाडांवर चमकणाऱ्या काजव्यांचा चांदण्याच्या साक्षीने प्रकाशोत्सव अनुभवला. चित्रपट, मालिकेत दाखविण्यात आलेले हे चमकणारे काजवे प्रत्यक्ष पाहण्यासाठी पर्यटकांची राधानगरीत तुंबळ गर्दी झाल्याने हा एक झगमगता इव्हेंटच झाला होता. पहिला पाऊस पडेपर्यंत हा ‘काजवा महोत्सव’ रोज चालणार आहे.राधानगरी येथील बायसन नेचर क्लब या संस्थेमार्फत २६ मेपासून ‘काजवा प्रकाशोत्सव’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन शाहू छत्रपती यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, अजितदादा पवार यांच्या मातोेश्री आशाताई पवार, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन बायसन नेचर क्लबचे सम्राट केरकर यांनी केले.सायंकाळी सात ते रात्री १० या वेळेत काजव्यांचे दर्शन घेण्यासाठी पर्यटकांची पदभ्रमंती, चांदण्या रात्री सहकुटुंब स्नेहभोजन, करमणुकीचे कार्यक्रम अशा या काजवा महोत्सवात विविध ठिकाणांहून आलेल्या पर्यटकांनी भाग घेतला आहे. पहिला पाऊस पडेपर्यंत हा महोत्सव रोज अनुभवता येणार आहे.जैवविविधेतमध्ये महत्त्वाच्या आणि दुर्मीळ होत चाललेल्या काजव्यांचे दर्शन ही अनोखी अनुभूती शुक्रवारी रात्री पर्यटकांनी अनुभवली. मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून पहिल्या पावसाचे आगमन होईपर्यंत राधानगरी, दाजीपूर, काळम्मावाडी या जंगल परिसरातील असंख्य झाडांवर हे काजवे चमकताना दिसतात. याच काळात काजवे नैसर्गिकरीत्या आपल्या प्रकाशाने जोडीदाराला आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत असतात. काजव्यांचा हा तात्पुरता आशियाना अतिशय देखणा आणि विलोभनीय दिसतो आहे.निवडक झाडांवरच आढळतोनिसर्गातील अत्यंत अद्भुत असा हा कीटक राधानगरीसारख्या जंगल परिसरात चमकताना आढळतो. दाजीपूर, राधानगरी, काळम्मावाडी जंगल परिसरातील हिरडा, बेहडा, अंजनी, जांभूळ, आंबा, उंबर, करंज या निवडक झाडांवरच हा काजव्यांचा थवा पाहण्यास आढळतो.राधानगरीजवळील काळम्मावाडी परिसरात आयोजित करण्यात आलेल्या काजवा महोत्सवात शुक्रवारी पर्यटकांनी काजव्यांचा अनोखा प्रकाशोत्सव अनुभवला.