शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

औषधांच्या किमतीवरून होणारी फसवणूक थांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 05:17 IST

१ जुलैपासून लागू झालेल्या वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीमध्ये औषधांच्या किमतीवरून फसवणूक होत असल्याच्या तक्रारी, नॅशनल फार्मास्युटिकल्स प्रायसिंग आॅथॉरिटीकडे आल्या होत्या

मुंबई : १ जुलैपासून लागू झालेल्या वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीमध्ये औषधांच्या किमतीवरून फसवणूक होत असल्याच्या तक्रारी, नॅशनल फार्मास्युटिकल्स प्रायसिंग आॅथॉरिटीकडे आल्या होत्या. औषध विक्रेत्यांकडून कर लागू करून खोट्या किमतीमुळे ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे आढळले. या फसवणुकीला आळा घालण्यासाठी नॅशनल फार्मास्युटिकल्स प्रायसिंग आॅथॉरिटीने ‘फार्मा सही दाम’ नावाचे अ‍ॅप्लिकेशन सुरू केले आहे.या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून ग्राहकांना सहज औषधांची खरी किंमत पडताळता येणार आहे. त्यामुळे फार्मासिस्टकडून होणाºया फसवणुकीच्या तक्रारींचे प्रमाण कमी होईल. ग्राहकांनी अशी फसवणूक झाल्यास, त्वरित आॅथॉरिटीकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या अ‍ॅपविषयी अधिकाधिक जनजागृती करण्यावरही आॅथॉरिटीचा भर आहे. वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीनंतर नियमित वापर होणाºया ७८ टक्के औषधांच्या किमतींवर कोणताही फरक पडणार नसल्याचे, नॅशनल फार्मास्युटिकल्स प्रायसिंग अथॉरिटीने जाहीर केले होते. ७६१ गरजेच्या औषधांच्या जीसटीनंतरच्या किमती जाहीर केल्या होत्या. त्यानुसार, एचआयव्ही, कॅन्सर आणि मधुमेहासह अन्य विकारांवरील उपयुक्त औषधांच्या किमतीत घट करण्यात आली आहे.भविष्यात रक्तपेढ्यांमध्येही फार्मासिस्ट अनिवार्य करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्राने हालचाली सुरू केल्या असून ठोस तरतुदीसाठी सुरुवात केली आहे. रक्तामधील प्लाझ्मासारखे घटक औषधांमध्ये मोडतात. मात्र तेथे फार्मासिस्ट नसतात. त्यामुळे रक्तपेढ्यांमध्येही फार्मासिस्ट बंधनकारक करण्याचा विचार पुढे आला आहे. त्यानुसार केंद्राच्या सेंट्रल ड्रग स्टॅण्डर्ड कंट्रोल आॅर्गनायझेशनकडून यासंबंधीची प्रक्रिया सुरू आहे. हा निर्णय प्रत्यक्षात येण्यासंबंधीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष कैलास तांदळे यांनी दिली आहे.