शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादचा प्रणव भारतीय लष्करात होणार लेफ्टनंट

By admin | Updated: June 15, 2017 19:55 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील गणित विभागाचा विद्यार्थी प्रणव सुधाकर शेंडगे हा भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट होणार आहे.

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 15 - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील गणित विभागाचा विद्यार्थी प्रणव सुधाकर शेंडगे हा भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट होणार आहे. पदव्युत्तर पदवीस्तरावर विविध विषयांमधुन लेफ्टनंटपदासाठी घेण्यात आलेल्या खडतर चाचणीत प्रणवची निवड झाली. देशभरातुन एकुण १७५७ उमेदवारांपैकी केवळ ७ जणांची निवडण्यात आले. यात महाराष्ट्रातुन प्रणव हा एकमेव विद्यार्थी आहे.
 
भारतीय सैन्य दलात पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पाच दिवसांच्या मानसशास्त्रीय चाचणी,  मैदानी आणि मुलाखतीच्या खडतर चाचणीतुन लेफ्टनंटपदाच्या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येते. या चाचणीसाठी देशभरातुन १७५७ उमेदवार निवडण्यात आले होते. या सर्व उमेदवारांनी भोपाळ, बंगळुरू आणि अलाहाबाद येथे चाचणी घेण्यात आली. प्रणव शेंडगे याने फेब्रुवारी महिन्यात भोपाळ येथे ही चाचणी दिली. याचा गुरूवारी निकाल जाहीर झाला. यात देशभरातुन केवळ ७ विद्यार्थ्यांची निवडण्यात आले. गणित विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केलेल्या प्रणवचा विज्ञान गटातुन निवड झाली. ही परीक्षा उत्तीर्ण झालेला प्रणव हा राज्यातील एकमेव विद्यार्थी आहे. प्रणव हा मुळचा गेवराई तालुक्यातील कोल्हेर गावाचा असून, त्याचे वडिल डॉ. सुधाकर शेंडगे  विद्यापीठातील हिंदी विभागात प्राध्यापक आहेत.
पदवीला पटकावले होते सुवर्णपदक-
बारावीमध्ये ८५ टक्के पडल्यानंतर अभियांत्रिकीच्या नामांकित महाविद्यालयात सहजरित्या प्रवेश मिळत असताना प्रणव याने गणित विषयाची निवड करत बी.एस्सी करण्याचा निर्णय घेतला. देवगिरी महाविद्यालयात बी.एस्सीचे शिक्षण घेत असताना तो विद्यार्थी संसदेचा सचिवही बनला. त्याच वर्षी विद्यापीठाच्या संसद मंडळाची निवडणूकीत विजय मिळवत विद्यापीठाच्या विद्यार्थी संसदेचा सचिव बनला होता. बी. एस्सीला गणित विषयात सुर्वणपदक पटकावत ९१ टक्के घेतले. यानंतर विद्यापीठातील गणित विभागातुन एम.एस्सी ७४ टक्के घेत नुकतेच पुर्ण केले आहे. 
डेहराडूनला मिळणार प्रशिक्षण-
भारतीय सैन्य दलाच्या परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये प्रशिक्षण देण्यात येते. यासाठी त्यांना ४ जुलैपर्यंत अ‍ॅकॅडमीत दाखल व्हावे लागणार आहे.
 
ग्रामीण भागात गुणवत्ता ठासून भरलेली आहे. मात्र ठरलेली पायवाट सोडून बाजूचा विचार करण्याची गरज आहे. माहिती नसलेल्या रस्त्याची निवड केल्यामुळे हे यश मिळाले. या आई-वडिलांसह शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे.
- प्रणव शेंडगे