शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादचा धान्य अडत बाजार उद्या उघडणार

By admin | Updated: July 20, 2016 19:30 IST

तब्बल १३ दिवसांपासून बंद असलेल्या जाधववाडी कृउबा येथील धान्याचा अडत बाजार अखेर उद्या गुरुवार २१ रोजी सुरु होणार आहे. शेतकऱ्यांकडून अडत वसूल न करण्याचा राज्यशासनाच्या

१३ दिवसानंतर बेमुदत बंद मागे : शेतकऱ्यांकडून अडत वसूल न करण्याच्या अध्यादेशाचे व्यापारी पालन करणार

औरंगाबाद- तब्बल १३ दिवसांपासून बंद असलेल्या जाधववाडी कृउबा येथील धान्याचा अडत बाजार अखेर उद्या गुरुवार २१ रोजी सुरु होणार आहे. शेतकऱ्यांकडून अडत वसूल न करण्याचा राज्यशासनाच्या अध्यादेशाचे पालन करण्याचे अडत्यांनी ठरविले आहे. मात्र, खरेदीदाराकडून किती अडत घ्यायची यावर अडत्यांमध्ये मतभेद अजूनही कायम आहे. धान्याची हर्राशी झाल्यावर अडते शेतकऱ्यांकडून ३ टक्के अडत वसूल केली जात असत. मात्र, अन्य राज्यात ही अडत खरेदीदाराकडून वसूल केली जाते. यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी राज्यसरकारने अध्यादेश काढून. कृउबा समितीअंतर्गत शेतकऱ्यांनी धान्य,कडधान्य विकल्यास त्यावरील अडत त्यांच्या ऐवजी खरेदीदाराकडून अडत वसूल करावी,असे आदेशात म्हटले होते. मात्र, यास विरोध करीत अन्य बाजार समितीप्रमाणे येथील अडत्यांनी बेमुदत बंद पुकारला होता. बंदला १३ दिवसपूर्ण झाले तरीही सरकार मात्र, आपल्या अध्यादेशावर ठाम होते. यामुळे अखेर अडत्यांना अध्यादेश मान्य करावाच लागला. बुधवारी याबाबत जाधववाडीतील मार्केट यार्डात अडत्यांची बैठक झाली. यात राज्यातील अन्य बाजार समितीमधील अडत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मोबाईलवर मते जाणून घेण्यात आली. खरेदीदाराकडून किती आडत घ्यायची यावर मात्र, अडत्यांमध्ये मतभेद असल्याचे आढळून आले. कोणी ३ टक्के तर कोणी अडीच टक्के अडत घ्यावी असे मत मांडत होते. अडत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. मात्र, यावर सहमती झाली नाही. शेतीमालाची रक्कम २० ऐवजी ९ दिवसात खरेदीदाराने अडत्याला द्यावी, यासंदर्भातही चर्चा सुरु होती. यासंदर्भात औरंगाबाद मर्चन्टस् असोसिएशनचे अध्यक्ष कन्हैयालाल जैस्वाल यांनी सांगितले की, आता राज्यसरकारच्या अध्यादेशाप्रमाणे आम्ही शेतकऱ्यांकडून अडत वसूल करणार नाही. मात्र, खरेदीदाराकडून किती आडत घ्यावी, यासंदर्भात अडते व खरेदीदार यांची बैठकी घेऊन त्यात ठरवू. सचिव दिलीप गांधी यांनी सांगितले की, बेमुदत बंद मागे घेतला असून गुरुवारपासून जाधववाडीतील धान्याचा अडत बाजाराला सुरुवात होणार आहे.