शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादकरांनी अनुभवली नेपाळ दुर्घटनेची दाहकता

By admin | Updated: April 27, 2015 02:02 IST

नेपाळ व भारताला शनिवारी सकाळी प्रचंड हादरा देणाऱ्या विनाशकारी भूकंपाची दाहकता औरंगाबादेतील जैन समाजबांधवांनी ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवली.

अमिताभ श्रीवास्तव, औरंगाबादनेपाळ व भारताला शनिवारी सकाळी प्रचंड हादरा देणाऱ्या विनाशकारी भूकंपाची दाहकता औरंगाबादेतील जैन समाजबांधवांनी ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवली. शहरातील ५ जण आणि जामनेर (जि. जळगाव) येथील १ असे एकूण ६ भाविक नेपाळची राजधानी काठमांडूत सुरक्षित आहेत. नेपाळहून मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादेतील व्यापारी आणि जैन समाजाचे पद्मराज सुराणा, उत्तम सुराणा, जतनराज सुराणा, लालचंद सिपानी व त्यांची पत्नी बिमलादेवी सिपानी व जामनेरचे प्रदीप कुचेरिया तेरापंथी जैनाचार्य महाश्रमणजी मसा यांच्या प्रवचनात सहभागी होण्यासाठी काठमांडूला गेले होते. तेथील बालमंदिर शाळेच्या परिसरात हे प्रवचन सुरू आहे. महाराजांचे प्रवचन संपले आणि मंगलपाठानंतर ते सभागृहातून बाहेर निघत असतानाच अचानक जमिनीचा थरकाप झाला आणि क्षणार्धात सर्व मंडप उद्ध्वस्त झाला. तेरापंथी जैन समाजाचे माजी अध्यक्ष असलेल्या पद्मराज सुराणा यांनी ‘लोकमत’चे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा यांना सांगितले की, भारतीय प्रमाणवेळेनुसार पावणेबारा वाजेच्या सुमारास महाराज सुरक्षित बाहेर पडले व जबरदस्त भूकंप येऊन मंडप उद्ध्वस्त झाला. महाराज सुरक्षित बाहेर पडले; परंतु मंडप अंगावर पडून काही भाविक किरकोळ जखमी झाले. सुराणा म्हणाले की, औरंगाबादेतील सर्व भाविक आणि जामनेरचे त्यांचे नातेवाईक सुरक्षित आहेत. त्यांना साधे खरचटलेही नाही; परंतु ते म्हणाले, पावणेबारा वाजेपासून सुरू भूकंपाच्या धक्क्यानंतर दुपारी चार वाजेपर्यंत अधूनमधून हादरे बसत होते. शनिवारच्या प्रवचनासाठी भारतातून योगगुरू रामदेव आणि त्यांचे शिष्य बालकृष्णदेखील प्रवचनस्थळी आले होते. तेदेखील सुरक्षित मंडपातून बाहेर पडले आहेत.