शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद: आयुर्वेदिक सेक्सवर्धक औषधीत भेसळ, कंपनीविरूद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 20:34 IST

सेक्सवर्धक आणि गुडघे दुखीवरील आयुर्वेदिक औषधात अ‍ॅलोपॅथी रसायनाची भेसळ करून नागरिकांची फसवणूक करणा-या दोन राजस्थानी औषध निर्मिती कंपन्यांविरूद्ध  गुन्हा

औरंगाबाद, दि. 23 - सेक्सवर्धक आणि गुडघे दुखीवरील आयुर्वेदिक औषधात अ‍ॅलोपॅथी रसायनाची भेसळ करून नागरिकांची फसवणूक करणा-या दोन राजस्थानी औषध निर्मिती कंपन्यांविरूद्ध  गुन्हा दाखल झाला आहे. आयुर्वेदिक असल्याचे सांगून जनतेची फसवणूक केल्याप्रकरणी सिटीचौक ठाण्यात अन्न व औषधी प्रशासन विभागाने वेगवेगळे गुन्हे नोंदविले.  या दुकानातून सुमारे ४० हजार रुपये किंमतीची औषधी जप्त करण्यात आली.

सारंग अविनाश जोशी(गुलमंडी), प्रेमपालसिंग धुना(रा. गंगानगर, राजस्थान)अशी गुन्हा नोंदविण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याविषयी अधिक माहिती देताना सिटीचौक पोलिसांनी सांगितले की, अन्न व औषधी प्रशासन विभागाचे निरीक्षक माधव निमसे यांनी १४ सप्टेंबर २०१६ रोजी सुपारी हनुमान रोड येथील श्रीकृष्ण आयुर्वेदिक भांडार  ३ एक्स गुटीका हे सेक्स  वर्धक आयुर्वेद औषध आणि मे बिर्ला फार्मास्युटीकल्स कंपनीचे गुडगेदुखीवरील औषध म्हणून रुमावीन वटी विक्रीसाठी असल्याचे आढळून आले. या औषधाचे सॅम्पल त्यांनी जप्त करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले. या दोन्ही सॅम्पलच्या तपासणीचा अहवाल  प्रयोगशाळेकडून  अन्न व औषधी प्रशासन विभागाला प्राप्त झाला. सेक्स वर्धक थ्री एक्स  गुटिकामध्ये अ‍ॅलोपॅथीक सिल्डेनोफिल सायट्रेट हे घटक द्रव्याचे मिश्रण केलेले आढळले. तर रुमावीन वटी मध्ये निमेसुलाईड व डायक्लोफेनॉक सोडियम  या अ‍ॅलोपॅथीक औषधाची मात्रा आढळली. 

मान्यताप्राप्त औषध निर्माण कंपनीलाच अ‍ॅलोपॅथीच्या औषधी तयार करण्याचे अधिकार असल्याने निरीक्षक निमसे यांनी दुकानदार सारंग जोशी यांच्याकडे औषध कंपन्यांची माहिती विचारली. तेव्हा राजस्थानमधील गंगानगर येथील प्रेमपालसिंग धुना यांच्या कंपनीकडून  सेक्स वर्धक गुटिका तर  रुमावीन वटी ही संतोष कुमार बिर्ला, नवीनचंद्र बिर्ला(रा. गंगानगर, राजस्थान)यांच्याकडून मागविली असल्याचे त्यांनी सांगितले.  या दोन्ही कंपंन्यांच्या संचालकांना तक्रारदार यांनी औषधी तयार करण्याचा परवाना सादर करण्याचे सांगितले असता दोन्ही कंपनीने त्यांना सदर औषधी त्यांच्या कंपनीची नसल्याचे दोन्ही तक्रारदार यांना कळविले. आरोपी हे कारवाई टाळण्यासाठी टोलवाटोलवी करीत असल्याचे तक्रारदार यांच्या लक्षात आले. यात आठ महिन्याचा कालावधी उलटल्याने तक्रारदार यांनी अखेर २२ आॅगस्ट रोजी सिटीचौक ठाण्यात वेगवेगळ्या गुन्ह्याची नोंद केली. 40 हजाराची औषधी जप्त- निमसेऔषधी निरीक्षक माधव निमसे म्हणाले की, आरोपी कंपन्या आणि दुकानदार हे टोलवाटोलवी करीत असल्याचे लक्षात येताच आपण पोलिसांत तक्रार नोंदविली. आरोपीच्या दुकानातून सुमारे ४० हजाराची औषधी जप्त केली.