शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
Tejasvee Ghosalkar: तेजस्वी घोसाळकर मुंबै बँकेच्या संचालकपदी
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

औरंगाबाद खंडपीठाची आंध्र पोलिसांना नोटीस

By admin | Updated: December 2, 2015 01:51 IST

चोरीच्या प्रकरणातील सोने खरेदी केल्याच्या आरोपावरून विजयवाडा (आंध्र प्रदेश) पोलिसांनी उस्मानाबादच्या दोन सराफा व्यावसायिकांना बेकायदेशीरपणे पोलीस कोठडीत डांबून ठेवले

औरंगाबाद : चोरीच्या प्रकरणातील सोने खरेदी केल्याच्या आरोपावरून विजयवाडा (आंध्र प्रदेश) पोलिसांनी उस्मानाबादच्या दोन सराफा व्यावसायिकांना बेकायदेशीरपणे पोलीस कोठडीत डांबून ठेवले. या प्रकरणात दाखल झालेल्या ‘हेबियस कॉर्पस’ याचिकेवरील सुनावणीत औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला व न्यायमूर्ती व्ही. के. जाधव यांनी गृहसचिवांसह विजयवाडा पोलिसांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले.याचिकेत म्हटल्यानुसार परंडा (जि. उस्मानाबाद) येथील सराफ अनिल पेडगावकर व हिरालाल पेडगावकर यांच्याकडे ६ नोव्हेंबर २०१५ रोजी दोन जीपमधून विजयवाडा येथील पोलीस आले. त्यांनी दोन्ही व्यापाऱ्यांना जबरदस्तीने वाहनात कोंबले. त्यांना कुठे नेत आहोत, याची काहीही माहिती दिली नाही. ६ ते २२ नोव्हेंबरपर्यंत त्यांना अटकही दाखवली नाही. त्यामुळे शोभाबाई हिरालाल पेडगावकर यांनी परंडा पोलीस निरीक्षक, उस्मानाबाद पोलीस अधीक्षक व विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे तक्रार दिली होती. मात्र, त्याचाही उपयोग झाला नाही. विशेष पोलीस महानिरीक्षकांनी चौकशी करण्याचे तोंडी आदेश दिले. कारवाई झाली नाही. त्यामुळे औरंगाबाद खंडपीठात हेबियस कॉर्पस याचिका दाखल करण्यात आली.या प्रकरणात खंडपीठाने प्रतिवादी गृहसचिव, उस्मानाबाद पोलीस अधीक्षक, परंडा पोलीस निरीक्षक, विजयवाडा पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक यांना नोटीस बजाविण्याचे आदेश दिले.