शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

औराद शहाजानीत ढगफुटी, ९० मिनिटांत ९४ मिमी एवढा पाऊस

By admin | Updated: June 22, 2016 21:57 IST

सलग तीन वर्षांच्या दुष्काळानंतर बुधवारी औराद शहाजानी परिसरावर मान्सून प्रसन्न झाला.

ऑनलाइन लोकमतलातूर/औराद शहाजानी, दि. 22 - सलग तीन वर्षांच्या दुष्काळानंतर बुधवारी औराद शहाजानी परिसरावर मान्सून प्रसन्न झाला. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास जवळपास ९० मिनिटांत तब्बल ९४ मि.मी. पाऊस कोसळला. या ढगफुटीने शहरासह परिसरातील गावातही पाणी पाणी करून टाकले. या पावसाने २५ वर्षांचा रेकॉर्ड मोडला. बसस्थानकाचा दोन एकर आणि आजूबाजूचा दोन एकर अशा चार एकरांत जवळपास ५ फूट पाणी साचले. बाजारपेठेत पाणी घुसले. शेकडो घरांमध्ये पाणी-पाणी झाले. प्राथमिक आरोग्य केंद्रातही पाणी शिरल्याने रूग्णांचे हाल झाले. मुख्य रस्त्यावर गुडघ्याइतके पाणी वाहू लागल्याने सर्वच वाहतूक दोन तास विस्कळीत झाली. परिसरातील शेतातही पाणी साचले असून अनेक ठिकाणी पिके वाहून गेली आहेत. या ढगफुटीनंतर तगरखेडा येथील उच्चस्तरीय बंधाऱ्याची तीन दारे अर्ध्या मीटरने उघडून हे पाणी कर्नाटकात सोडण्यात आले आहे. औरादसह तगरखेडा, वांजरखेडा, शेळगी, सावरी, मानेजवळगा, बोटमाळ, ताडमुगळी या परिसरातही या पावसाने पाणी-पाणी करून टाकले. विजांच्या कडकडाटात ही जोरदार बरसात झाली. शेकडो एकराचे बांध फुटले पावसाच्या या थैमानात औराद शहाजानीच्या पंधरा किलोमीटर परिसरातील शेकडो एकर शेताचे बांध वाहून गेले. पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की, बांध वाहून गेल्याने दोन शेतकऱ्यांची शेती एका वावरात परावर्तीत झाली. पंधरा किलोमीटरच्या परिसरातील सर्वच शेतांनी बघावे तिकडे पाणीच पाणी दिसत होते.आतापर्यंत २०० मि.मी. पाऊस औराद शहाजानी हवामान केंद्रात झालेल्या नोंदीनुसार ९० मिनिटांत ९४ मि.मी. पावसाची नोंद झाली. यापूर्वी या परिसरात सव्वाशे मि.मी. पावसाची नोंद झाली होती. बुधवारचा पाऊस ग्रहीत धरला तर आतापर्यंत सव्वादोनशे मि.मी. पावसाची नोंद परिसरात झाली आहे. गेल्या २५ वर्षांत जून महिन्याच्या कालावधीत झालेली ही विक्रमी नोंद असल्याचे औराद हवामान केंद्राचे मोजमापक मुकर्रम नाईकवाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.