शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आॅगस्ट महिना पावसाचा

By admin | Updated: August 2, 2015 03:11 IST

जुन महिन्यांत पडलेल्या पावसाने जुलैमध्ये हात आखडता घेतला असला तरी पश्चिम बंगाल, राजस्थान आणि कर्नाटकवर झालेल्या वातावरणीय बदलामुळे आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीला देशभरात

मुंबई : जुन महिन्यांत पडलेल्या पावसाने जुलैमध्ये हात आखडता घेतला असला तरी पश्चिम बंगाल, राजस्थान आणि कर्नाटकवर झालेल्या वातावरणीय बदलामुळे आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीला देशभरात चांगला पाऊस होईल, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.जुलै महिन्याच्या अखेरीस देशभरातील हवामान प्रणाली कुमकुवत झाली. त्यामुळे पावसाचा जोर ओसरला. आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीला ही हवामान प्रणाली जोर धरणार आहे. त्यामुळे आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीला आणि शेवटी चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. उत्तर भारतातील काही भाग, विशेषत: पंजाब, हरियाणा आणि दिल्ली आणि आजूबाजूच्या प्रदेशासह पूर्व भारतात पश्चिम बंगाल, ओरिसा व झारखंड येथेही चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे या प्रदेशातील काही भागात मुसळधार पाऊस पडेल, असा इशाराही स्कायमेटने दिला आहे.सद्यस्थितीमध्ये पश्चिम बंगालवर निर्माण झालेल्या आणि तीव्रता कमी झालेल्या ‘कोमेन’ या चक्रीवादळामुळे पूर्व भारतात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होतो आहे. आता ही हवामान प्रणाली पश्चिमेकडे सरकण्याची चिन्हे आहेत. त्याचे रुपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे संबधित ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. (प्रतिनिधी)वायव्य राजस्थान आणि लगतच्या भागावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र आता मध्य पाकिस्तान व लगतच्या पश्चिम राजस्थानावर आहे. बांग्लादेशाच्या भागावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा जोर कमी झाला आहे. मागील चोविस तासांत कोकणात मुसळधार पाऊस पडला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे. तर ३,४ आणि ५ आॅगस्ट रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे.