शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेच्या निकालापूर्वीच राज ठाकरेंकडून ऑडिट

By admin | Updated: May 10, 2014 23:41 IST

लोकसभा निवडणुकीत टीकेला सामोरे गेलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निकालापूर्वीच निर्णयाचा अंदाज बांधून कारणमीमांसा सुरू केली आहे.

नाशिक : महापालिकेत सत्ता मिळूनही लोकहिताची अपेक्षित कामे होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीत टीकेला सामोरे गेलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निकालापूर्वीच निर्णयाचा अंदाज बांधून कारणमीमांसा सुरू केली आहे. शनिवारी प्रत्येक नगरसेवकाशी इन कॅमेरा चर्चा करतानाच त्यांनी लोकसभेतील परिस्थितीबरोबरच पालिकेत सत्ता असताना कोठे कमी पडतोय याविषयी नगरसेवकांच्या भावना जाणून घेतल्या. राज ठाकरेंनी महापौर आणि आमदारांच्या कामगिरीविषयीदेखील प्रश्न उपस्थित केल्याने नजीकच्या काळात खांदेपालट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी मानली जात आहे. गेल्या दोन ते अडीच वर्षांच्या कालावधीत नागरिकांचे समाधान होऊ शकेल अशा पद्धतीने काम होऊ न शकल्याने लोकसभा निवडणुकीत मनसेला टीकेला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे शनिवारी येथील राजगड कार्यालयात त्यांनी पालिकेतील कामगिरीची माहिती घेऊन एकप्रकारे पंचनामाच केला. पालिकेतील ३९ पैकी ३७ नगरसेवकांशी एकावेळी एकच अशी चर्चा त्यांनी केली. पालिकेत कामे होतात काय, तुमच्य प्रभागात किती कामे झाली? किती कामे मंजूर आहेत, कामे झाली असतील तर त्याबाबत लोकांपर्यंत माहिती पोहोचली काय, असे प्रश्न करताना दहा कोटी, वीस कोटी रुपयांची कामे झाली असे सांगणार्‍या नगरसेवकांकडून सायंकाळपर्यंत कामांच्या याद्याही त्यांनी मागविल्या. गोपनीय भेटीत अनेकांनी उघडपणे महापौर आणि अन्य पदाधिकार्‍यांच्या कामगिरीवर टीका केली. या सर्व मुद्यांची नोंद राज ठाकरे यांनी स्वत: लेखी नोंद करून घेतली. (प्रतिनिधी)