शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज वसुलीसाठी लिलाव?

By admin | Updated: April 6, 2016 04:30 IST

भ्रष्टाचार, बेहिशेबी मालमत्ता आणि ‘मनी लॉड्रिंग’च्या प्रकरणांमध्ये अडकलेले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या मे. आर्मस्ट्राँग एनर्जी प्रा. लि.

मुंबई : भ्रष्टाचार, बेहिशेबी मालमत्ता आणि ‘मनी लॉड्रिंग’च्या प्रकरणांमध्ये अडकलेले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या मे. आर्मस्ट्राँग एनर्जी प्रा. लि. या कंपनीला दिलेल्या थकित कर्जाच्या वसुलीसाठी भारतीय स्टेट बँकेने या कंपनीच्या मालकीच्या नाशिक तालुक्यातील शिळापूर येथील स्थावर मालमत्तेचा प्रतिकात्मक ताबा घेतला आहे.वित्तीय संस्थांना थकित कर्जांच्या सक्तीने वसुलीचे अधिकार देणाऱ्या ‘सेक्युरिटायझेशन’ कायद्यानुसार स्टेट बँकेने ही कारवाई केली. संदर्भित कायद्यानुसार बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्याने मे. आर्मस्ट्राँग कंपनीच्या मालमत्तेचा ताबा घेतल्याची व त्याच्या संभाव्य विक्रीची जाहीर नोटीस सोमवारी वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध केली. या नोटिशीनुसार मे. आर्मस्ट्राँग एनर्जी कंपनीच्या मालकीची नाशकातील शिळापूर येथे सुमारे पाच हेक्टर जमीन व त्यावरील १०० चौ. मीटर आकाराचे बांधलेले घर या स्थावर मालमत्तेचा ३० मार्च रोजी बँकेने प्रतिकात्मक ताबा घेतला आहे.मे. आर्मस्ट्राँग एनर्जी कंपनीने स्टेट बँकेच्या नशिकमधील एसएमई शाखेकडून सहा कोटी आठ लाख ८४ हजार ६१७ रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जासाठी कंपनीचे संचालक असलेले छगन भुजबळ यांचे पुतणे समीर व मुलगा पंकज हे हमीदार राहिले होते व त्यांनी त्यासाठी कंपनीची उपर्युक्त स्थावर मालमत्ता तारण म्हणून ठेवली होती. या कर्जाची मुदतीत परतफेड झाली नाही म्हणून बँकेने थकित कर्जाची व्याज व दंडासह ६० दिवसांत परतफेड करण्याची ‘डिमांड नोटिस’ गेल्या वर्षी १६ मे रोजी दिली होती. त्यानंतरही कर्ज फेडले गेले नाही म्हणून बँकेने ‘सेक्युरिटायझेशन’ कायद्यानुसार ही कारवाई केली आहे. मे. आर्मस्ट्राँग एनर्जी कंपनी व समीर आणि पंकज भुजबळ या हमीदारांनी या मालत्तेसाठी महिनाभरात स्वत: बोली द्यावी अथवा अन्य एखादा खरेदीदार उभा करावा. अन्यथा या मालमत्तेची ठरलेल्या राखीव किंमतीस जाहीर विक्री करून कर्ज, दंड व व्याजाची वसुली केली जाईल, अशी ताकीद बँकेने या नोटिशीत दिली आहे. (विशेष प्रतिनिधी)