शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

घोटाळेबाजांच्या संपत्तीचा लिलाव

By admin | Updated: December 9, 2014 01:01 IST

घोटाळेबाजांकडून गिळंकृत करण्यात आलेली पीडित गुंतवणूकदारांची रक्कम त्यांना लवकरात लवकर परत मिळण्याचे संकेत मिळाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजारो पीडित गुंतवणूकदारांच्या

गुंतवणूकदारांना दिलासा - मुख्यमंत्र्यांचे निर्देशनरेश डोंगरे - नागपूरघोटाळेबाजांकडून गिळंकृत करण्यात आलेली पीडित गुंतवणूकदारांची रक्कम त्यांना लवकरात लवकर परत मिळण्याचे संकेत मिळाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजारो पीडित गुंतवणूकदारांच्या जिव्हाळ्याचा हा विषय सोमवारी रामगिरीवर चर्चेला घेऊन त्याबाबत उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित वरिष्ठांना दिल्याची खात्रीलायक माहिती आहे. अलीकडे राज्यात आर्थिक फसवणुकीच्या घटना वाढत चालल्या आहेत. वर्षभराच्या कालावधीत नागपुरात सुमारे दोन हजार कोटींच्या घोटाळ्यांची पाच प्रकरणे उघड झाली. जयंत झामरे, समीर जोशी, राजेश जोशी, प्रशांत वासनकर आणि अमोल ढाकें हे त्यातील आरोपी आहेत. तत्पूर्वी प्रमोद अग्रवाल आणि हरिभाऊ मंचलवारही गाजले. १०० कोटींपासून तो हजार कोटी रुपयांपर्यंतच्या फसवणुकीची ही प्रकरणे आहेत. या सर्व घोटाळेबाजांची फसवणूक करण्याची पद्धत एकसारखीच आहे. आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून दलालामार्फत ठेवीदारांची रक्कम घ्यायची. त्यांना पोस्टडेड चेक, प्रॉमिसरी नोट द्यायची आणि विशिष्ट कालावधीनंतर गाशा गुंडाळायचा. उपरोक्त सर्वांनी नागपुरात वेगवेगळ्या कंपन्या थाटून अशा पद्धतीने हजारो ठेवीदारांना गंडा घातला आहे. रक्कम परत मिळत नसल्यामुळे पीडित ठेवीदार पोलिसांकडे तक्रार दाखल करतात. पोलीस गुन्हे दाखल करून आरोपींनाअटक करतात. प्रकरण कोर्टात जाते. तारखा सुरू होतात अन् ठेवीदारांच्या वाट्याला प्रचंड मनस्ताप येतो. त्याची रक्कम परत मिळण्याची आशा दिवसागणिक लुप्त होते. मानसिक धक्क्यामुळे काही गुंतवणूकदारांचा मृत्यू होतो. अनेकांची अवस्था वेड्यागत होते. हे सर्व लक्षात घेत मुख्यमंत्र्यांनी ठगबाजांना चाप बसवण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. गुंतवणूकदारांचे हितआज मुख्यमंत्र्यांनी रामगिरीवर वरिष्ठ पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत घोटाळेबाजांची जप्त केलेली संपत्ती तातडीने लिलाव करून त्यातून आलेली रक्कम पीडित गुंतवणूकदारांना तातडीने कशी परत करता येईल, त्याबाबत चर्चा करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या संपत्तीचा तातडीने लिलाव करण्याचे अधिकार उपजिल्हाधिकारी, सहायक जिल्हाधिकारी यांना देण्याचे ठरले. या अधिकाऱ्यांना दुसऱ्या कोणत्याच कामात न गुंतवता, केवळ जप्त संपत्तीच्या लिलावाच्या प्रक्रियेचीच जबाबदारी सोपवावी, असाही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे समजते. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे हजारो गुंतवणूकदारांना तातडीने न्याय मिळण्याची आशा पल्लवीत झाली आहे.(प्रतिनिधी)