शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अबबऽऽऽ कोंबड्यांना दिली जातेय चक्क दारूची मात्रा !

By admin | Updated: January 14, 2015 00:27 IST

लय भारी टॉनिक : वजन वाढविण्यासाठी पोल्ट्री फार्म चालकांची नामी शक्कल

भुर्इंज : ‘धंदा है पर गंदा है’ असं आपणाकडे विनोदानं म्हटलं जाते. धंदा चांगला करण्यासाठी व्यापारी नको ते उद्योग करत असल्याचे आपण पाहतो. पोल्ट्री व्यावसायीक असेच काहीसे करत आहेत. कोंबड्यांचे वजन वाढावे, यासाठी पोल्ट्रीचालक कोंबड्यांना दारूची मात्रा देत आहेत. शेतातील पिकांवर किड नियंत्रणासाठी आजवर दारू फवारली जात होती. आता मात्र पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांना वजन वाढविण्यासाठी चक्क दारूचे टॉनिक दिले जात आहे. दारू पाजल्यामुळे कोंबड्यांना भूक वाढते. परिणामी त्यांचे वजन वाढते. वजन वाढल्यामुळे पैसेही चांगले मिळत असल्याचे कुकूटपालन व्यावसायिकांचे म्हणणे आहे. पोल्ट्री फार्ममध्ये पाळल्या जात असलेल्या कोंबड्यांचे वजन जास्तीत जास्त असावे, यासाठी विविध प्रकारांच्या खाद्यांबरोबरच विविध औषधांचाही वापर केला जातो. अवघ्या ४५ दिवसांत कोंबड्यांची वाढ परिपूर्ण व्हावी, यासाठी त्यांचे पालनपोषण कसे करावे यासंदर्भात विविध मतप्रवाह आहेत. त्यांचे पालनपोषण नैसर्गिक की अनैसर्गिक पद्धतीने करावे, याबाबतही वाद-विवाद आहेत. काही व्यवसायिक कोंबड्यांचे वजन जास्तीत जास्त वाढविण्यासाठी नाना क्लृप्त्या लढवत आहेत. त्यातूनच जिल्ह्यातील काही व्यावसायिकांनी कोंबड्यांना दारू पाजणे सुरू केले आहे. त्यातून आर्थिक भरभराट साधण्याचे प्रयत्न केले जात आहे. (वार्ताहर) औषधे परवडत नाहीत, त्यामुळे काहीही...! अनेक नामांकित कंपन्या पोल्ट्री फार्मचालकांना विशिष्ट भाडेतत्त्वावर कोंबड्यांची पिल्ले सांभाळण्यासाठी देत असतात. त्याच्या मोबदला दिला जातो. मात्र, या पैशांत कोंबड्यांचे वजन वाढविण्यासाठी टॉनिक, औषधे खरेदी करणे पोल्ट्री व्यावसायिकांना परवडत नाही. तरीही अनेक ठिकाणी औषधे खरेदी करुन त्यांना दिले जाते. मात्र, कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न मिळविण्यासाठी काही व्यावसायिक कोंबड्यांना दारू देत आहेत.