शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

एटीव्हीएम कार्डने भरा मुतारीचे शुल्क

By admin | Updated: September 26, 2014 03:24 IST

सुट्या पैशांची चणचण भासत असल्याने अनेक ठिकाणी त्यावरून वादविवाद होत असताना दिसतात

मुंबई : सुट्या पैशांची चणचण भासत असल्याने अनेक ठिकाणी त्यावरून वादविवाद होत असताना दिसतात. हे पाहता हा वाद रेल्वे स्थानकांवरील मुतारीचे शुल्क भरताना होऊ नये यासाठी नव्याने बांधण्यात येणाऱ्या मुता-यांसाठी एटीव्हीएम कार्डद्वारे शुल्क भरण्याच्या पर्यायाचा विचार मध्य रेल्वेकडून केला जात आहे. सध्या रेल्वे स्थानकांवर असणाऱ्या मुताऱ्यांचा वापर करताना महिला प्रवाशांकडून एक रुपया शुल्क आकारले जाते. तर यापुढे काही स्थानकांवर नव्याने बांधण्यात येणाऱ्या मुताऱ्यांचा वापर करणाऱ्या पुरुष प्रवाशांकडूनही शुल्क आकारण्याचा विचार मध्य रेल्वेकडून होत आहे. मध्य रेल्वेच्या २0 स्थानकांवर नव्याने बांधण्यात येणाऱ्या मुताऱ्यांसाठी स्वारस्य प्रस्ताव मागवण्यात येत आहे. या मुताऱ्यांच्या वापर प्रवाशांकडून करतानाच सुटा एक रुपया देण्यावरून कुठलाही वाद होऊ नये यासाठी मध्य रेल्वे एक नवीन पर्यायाच्या विचारात आहे. या मुताऱ्यांचे शुल्क प्रवाशांकडून अदा करताना ते एटीव्हीएमद्वारे अदा करता येऊ शकतात का याचा विचार केला जात आहे. यामुळे प्रवाशांची सुट्या पैशांच्या कटकटीतून सुटकेसाठी हा पर्याय शोधत आहोत, असे मध्य रेल्वे- महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद यांनी सांगितले. (प्रतिनिधी)