शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांचे वेतनवाढीकडे लक्ष

By admin | Updated: July 1, 2016 04:02 IST

केंद्र शासनातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाल्याने राज्य सरकारमधील सुमारे २६ लाख कर्मचाऱ्यांमधूनही सातव्या वेतन आयोगाची मागणी होऊ लागली

मुंबई : केंद्र शासनातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाल्याने राज्य सरकारमधील सुमारे २६ लाख कर्मचाऱ्यांमधूनही सातव्या वेतन आयोगाची मागणी होऊ लागली आहे. येत्या तीन महिन्यांत वेतन आयोगाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने केली आहे.महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग.दि. कुलथे यांनी सांगितले की, राज्यात १९ लाख ५८ हजार सरकारी कर्मचारी आहेत. तर पेन्शनधारकांची संख्या साडेसहा लाखापर्यंत आहे. या सर्वांना सातव्या वेतन आयोगाच्या कक्षेत घेण्यासाठी सरकारवर वार्षिक १५ हजार कोटींचा बोजा पडणार आहे. त्यातील ५ हजार कोटींची तरतूद शासनाने याआधीच्या अर्थसंकल्पात केली आहे. बुधवारी केंद्र सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला आहे. त्यामुळे राज्यातही वेळकाढूपणा न करता तत्काळ वेतन आयोग लागू करण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी.वेतन आयोग लागू करण्यापूर्वी सरकारने विद्यमान वेतन त्रुटी दूर करण्याची मागणीही महासंघाने केली आहे. तत्काळ समानीकरण समिती स्थापन करून निवृत्त वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याची नेमणूक शासनाने करावी. सर्व संघटनांच्या प्रतिनिधींच्या मुलाखती तत्काळ संपवाव्यात किंवा त्याची जबाबदारी महासंघाला द्यावी. जेणेकरून या प्रक्रियेसाठी अधिक वेळ खर्ची घालावा लागणार नाही. पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगातील संवर्गातील त्रुटी अद्याप कायम आहेत. (प्रतिनिधी)।केंद्र सरकारचा तिढा सुटेनाकेंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६पासून सातवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा केली आहे. मात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या नवी दिल्ली येथील कॉन्फडरेशन फॉर सेंट्रल गव्हर्नमेंट या मध्यवर्ती संघटनेने संपाचा पवित्रा कायम ठेवला आहे. ११ जुलैपासून कर्मचारी संपावर जाऊन सरकारचा निषेध व्यक्त करतील. यामध्ये सर्वच केंद्रीय कर्मचाऱ्यांसोबत आयकर विभागातील राज्यातील ६५ हजार कर्मचारी सामील होतील, असे इन्कम टॅक्स एम्प्लॉईज फेडरेशनचे मुंबई अध्यक्ष अशोक साळुंखे यांनी सांगितले.