शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

शालेय मैदानावर १ तास उपस्थित राहा, १० गुण मिळवा- क्रीडामंत्री विनोद तावडे

By admin | Updated: June 19, 2016 21:33 IST

प्रत्येक मुलगा किमान १ तास मैदानावर खेळण्यासाठी उपस्थित राहिला तर त्या मुलाला शाळेमध्ये १० गुण द्यायला पाहिजेत

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 19 - प्रत्येक मुलगा किमान १ तास मैदानावर खेळण्यासाठी उपस्थित राहिला तर त्या मुलाला शाळेमध्ये १० गुण द्यायला पाहिजेत, असे वक्तव्य राज्याचे क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी केले आहे. दादर, शिवाजी पार्क येथील ३२ व्या समर्थ पावसाळी मल्लखांब शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. दादरच्या श्री समर्थ व्यायाम मंदिराने आयोजित केलेल्या ३२ व्या समर्थ पावसाळी मल्लखांब शिबिराचे नुकताच उद्घाटन समारंभ राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी समर्थच्या मल्लखांबपटूंनी मल्लखांबाची प्रात्यक्षिके सादर केली. ती प्रात्यक्षिके पाहून तावडे म्हणाले की, प्रत्येक मुलगा किमान १ तास मैदानावर खेळण्यासाठी उपस्थित राहिला तर त्या मुलाला शाळेमध्ये १० गुण द्यायला पाहिजेत, तसेच विविध खेळांमधील चांगल्या खेळाडूंसाठी मोठ्या संख्येने चांगल्या नोकऱ्याही निर्माण झाल्या पाहिजेत व मी स्वत: त्यासाठी प्रयत्न करेन, असे आश्वासन उपस्थितांना दिले.मैदानावर मुलांनी खेळांचा सराव केला तरच खेळाडू तयार होतील; शिवाय मुले मोबाईल व टीव्हीपासून आपसूकच दूर होतील. खेळाडू आर्थिकृदृष्ट्या सक्षम असेल तर त्याची खेळात नक्कीच चांगली प्रगती होते. खेळाडूंना आर्थिकतेने सक्षम करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, त्यासाठी लवकरच ठोस पावले उचलण्याचे आश्वासन तावडे यांनी यावेळी दिले.मल्लखांबातील पहिले छत्रपती पुरस्कार विजेते व सध्या मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेचे कार्यवाह दत्ताराम दुदम हे देखील समारंभाला उपस्थित होते. या शिबिरात ३२५ विद्यार्थी सहभागी झाले असून, करंजगाव तसेच कोठुरे, निफाड, नाशिक येथील १२ तर कलाकार ट्रस्ट, दिल्ली या संस्थेतील २ विद्यार्थी सहभागी झाले आहेत. ज्येष्ठ मल्लखांब प्रशिक्षकांचा सत्कार समर्थचे ज्येष्ठ आजीव सभासद व ज्येष्ठ मल्लखांब प्रशिक्षक सुधाकर देखणे यांचा आणि त्यांच्या पत्नी आशाताई देखणे यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन खास सत्कार करण्यात आला. वयाच्या ८० व्या वर्षी देखील कार्यरत असलेल्या देखणे सरांनी समर्थचे संस्थापक व्यायाम महर्षी प्र. ल. काळे गुरुजी यांनी दिलेल्या व्यायामाच्या बाळकडूला सर्व श्रेय दिले.