शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कोठडीतील आरोपी महिलेवर फौजदाराचा बळजबरीचा प्रयत्न

By admin | Updated: August 20, 2016 19:41 IST

गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव पोलीस ठाण्यात पतीच्या खुनाच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपी महिलेवर सहाय्यक फौजदाराने बळजबरी करण्याचा प्रयत्न केला.

गोंदिया,  दि. २० -  जिल्ह्यातील गोरेगाव पोलीस ठाण्यात पतीच्या खुनाच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपी महिलेवर तेथील सहाय्यक फौजदाराने बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. ठाण्यातील महिला पोलिसांच्या सतर्कतेने हा प्रयत्न अयशस्वी झाला. ९ ऑगस्टच्या रात्री घडलेल्या या घटनेबाबत पोलीस विभागाने गुप्तता पाळत त्या फौजदारावर गुन्हा दाखल न करता त्याला १६ ऑगस्टला निलंबित केले.ग्यानिराम जिभकाटे (बक्कल नं.९९) असे त्याचे नाव आहे. विशेष म्हणजे अशाच एका प्रकरणात यापूर्वीही त्याच्यावर कारवाई झाली होती. मात्र त्यानंतर पुन्हा त्याला सेवेत नियमित करण्यात आले होते.
प्राप्त माहितीनुसार, गोरेगाव तालुक्याच्या जांभळी येथील जंगलात ३१ जुलै रोजी बोंडगावदेवी येथील एका विवाहित युवकाचा खून झाला होता. त्या खुनात इतर दोघांसह आरोपी म्हणून मृत युवकाच्या पत्नीलाही ६ ऑगस्ट २0१६ रोजी अटक झाली होती. त्या महिलेला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. १0 ऑगस्टपर्यंत ती पोलीस कोठडीत असताना तिच्या सुरक्षेसाठी दोन महिला पोलीस शिपाई मंजुषा घरडे व घनमारे ह्या सेवेत होत्या. सोबतच पोलीस ठाण्यात रात्रपाळीत कर्तव्यावर असलेला सहाय्यक फौजदार ग्यानिराम जिभकाटे हा होता. 
आरोपी महिला पोलीस ठाण्याच्या एका खोलीत असताना ९ ऑगस्टच्या रात्री जिभकाटे याने त्या महिलेच्या खोलीचे दार वाजवून तिला उठविले. तुझ्याकडे असलेली मुलगी कुणाची, तिला बापाचा दर्जा मी देईन, यासाठी तू माझ्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित कर, अशी मागणी त्याने केली. त्यानंतर त्या महिलेवर पोलीस ठाण्यातच बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.
 
 
गुन्हा का दाखल केला नाही?
सर्वसामान्य लोकांच्या संदर्भात साधी तक्रार आली की चौकशी न करताच अनेक वेळा पोलीस गुन्हा दाखल करतात. परंतु चक्क पोलीस ठाण्यात दोन महिला पोलीस कर्मचारी हजर असताना एखाद्या आरोपी महिलेचा विनयभंग करून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणार्‍या पोलीस कर्मचार्‍यावर गुन्हा का दाखल केला नाही, हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे. पोलीस विभाग बदनामीच्या भीतीपोटी गुन्हा दाखल करीत नाही किंवा आरोपीला वाचविण्यासाठी पोलिसांचा हा खटाटोप आहे का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
 
(तालुका प्रतिनिधी)