शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या मांडवात नवरदेवाला पेटविण्याचा प्रयत्न, प्रेयसीनेही घेतले विष

By admin | Updated: June 7, 2016 20:38 IST

प्रेमप्रकरण सुरू असताना प्रेयसीला अंधारात ठेवून दुसरा विवाह करणाऱ्या प्रियकराचा कायमचा काटा काढण्याच्या हेतूने तरुणीने भर मांडवात नवरदेवाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न केला

गजानन नानोटकरपुसला (अमरावती)  : प्रेमप्रकरण सुरू असताना प्रेयसीला अंधारात ठेवून दुसरा विवाह करणाऱ्या प्रियकराचा कायमचा काटा काढण्याच्या हेतूने तरुणीने भर मांडवात नवरदेवाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, वऱ्हाड्यांच्या जागरूकतेमुळे पुढील अनर्थ टळला. ही खळबळजनक घटना वरुड तालुक्यातील पुसला येथे एका विवाह सोहळ्यात ६ जून रोजी घडली. मांडवात पेट्रोलसह शिरलेली तरुणीदेखील विष प्राशन करून आल्याचे लक्षात येताच वऱ्हाड्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले.मध्य प्रदेशातील एका तरूणाचा पुसला येथील तरूणीशी विवाह ठरला होता. तोे ६ जून रोजी ठरल्याप्रमाणे वरातीसह वधूमंडपी आला. परंतु त्याच्या प्रेयसीला त्याच्या विवाहाची कुणकुण लागली आणि तिने सोमवारी सकाळी १० वाजताच पुसला गाठले. ती येथील बसस्थानकावरच थांबली. दुपारी साडेबारा वाजता नवरदेवाचे वधूमंडपी आगमन होताच मोक्याच्या प्रतीक्षेत असलेल्या तरूणीने थेट वधूमंडपात प्रवेश केला आणि नवरदेव बोहल्यावर चढताच हातात आणलेल्या पेट्रोलच्या दोन बाटल्यांमधील पेट्रोल नवरदेवाच्या अंगावर फेकले.

ती आगपेटी उगाळणार इतक्यात वऱ्हाडी मंडळींनी तिला बाजूला ओढले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.घटनेच्या वेळी ती तरुणीदेखील विषप्राशन करुनच आल्याचे वऱ्हाड्यांच्या लक्षात आल्याने तिला तातडीने पांढुर्णा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेनंतर वधुपक्षाची पाचावर धारण बसली होती. पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांच्या मध्यस्थीने दोन्ही पक्षांनी विवाह टिकविण्याची हमी स्टँपपेपर दिल्यानंतर सकाळच्या मुहूर्तातील हा सोहळा रात्री १० वाजता कसाबसा उरकला. दरम्यान वऱ्हाडयांनीसुध्दा काढता पाय घेतला होता. वधू-वर पक्षाच्या सहमतीने हा विवाह पार पडला. पोलिसांनीदेखील याप्रकरणी कोणतीही कारवाई कागदोपत्री न करता दोन्ही पक्षांमध्ये समेट घडवून आणल्याने गावकरी पोेलिसांच्या भूमिकेचे कौतुक करीत होते.