शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
3
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
4
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
5
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
6
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
7
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
8
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
9
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
10
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
11
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
12
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
13
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
14
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
15
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
16
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
17
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
18
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
19
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
20
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...

अतिरेकी घुसल्याची बोंब ठोकून लोकांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न- उद्धव ठाकरे

By admin | Updated: September 24, 2016 10:02 IST

फक्त चार शाळकरी मुलांनी ४ बंदूकधार पाहिले आणि सर्व 'प्रौढ' मंडळी तेव्हा डोळ्यांस पट्ट्या बांधून वावरत होती

ऑनलाइन लोकमत,मुंबई, दि. 24 -  काळ्या वेषातील ४ अतिरेकी घुसल्याची बोंब ठोकून लोकांचे लक्ष मूळ विषयावरून विचलित करण्यासाठी चार संशयित अतिरेक्यांची अदृश्य भुताटकी निर्माण केली की काय असे लोकांना वाटू लागल्याचे मत सामन्याच्या अग्रलेखातून व्यक्त करण्यात आलं आहे. चार सशस्त्र बंदूकधार्‍यांना फक्त चार शाळकरी मुलांनी पाहिले आणि सर्व 'प्रौढ' मंडळी तेव्हा डोळ्यांस पट्ट्या बांधून वावरत होती असे तरी कसे म्हणता येईल?, असाही खोचक सवाल सामनाच्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे. यानिमित्ताने सर्व यंत्रणा कामास लागल्या. दहशतवादी हल्ल्याची रंगीत तालीम झाली. उरणच्या शालेय विद्यार्थ्यांनी चार बंदूकधारी पाहिले व हे चार बंदूकधारी नंतर अदृश्य झाले. आता हे चार बंदूकधारी आहेत ते जमिनीत गडप झाले नाहीतर हवेत विरून गेले. कारण नौदल, हवाई दल, पोलीस यंत्रणेने जंग जंग पछाडूनही हे चार बंदूकधारी हाती लागलेले नाही, असं सामन्याच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी मत मांडलं आहे. काय म्हटले आहे अग्रलेखात-दिल्लीहून ह्यएनएसजीह्णच्या आठ तुकड्या उरणमध्ये दाखल झाल्या आहेत. एकंदरीत काय तर संपूर्ण उरण शहरास व आजूबाजूच्या गावांस पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. सरकारने अतिसावधान असायलाच हवे. राष्ट्राच्या व जनतेच्या सुरक्षेसाठी हे सर्व आवश्यक आहे, पण उरणमध्ये घुसलेले चार संशयास्पद लोक हे खरोखरच बंदूकधारी दहशतवादी असावेत का? यावर तपास यंत्रणांनी चिंतन करण्याची गरज आहे. उरणमध्ये इतका कडेकोट बंदोबस्त आहे की, तिथे आता मुंगीही शिरणार नाही व बाहेरचे पाखरूही फडफडणार नाही. त्यामुळे आता शिरलेले चार संशयास्पद बहुधा आतल्या आतच गुदमरून ह्यअल्लाह्णस प्यारे होतील. २६-११च्या वेळी जी सतर्कता दाखवायला हवी होती ती उरणच्या बाबतीत दाखवली जात आहे. पठाणकोट व उरीच्या लष्करी तळांबाबत जी गफलत झाली (असे संरक्षणमंत्री कबूल करतात) ती उरणच्या बाबतीत होणार नाही.-चार संशयास्पद अतिरेक्यांची अफवा पसरवून पोलीस यंत्रणेस गुंतवून ठेवायचे आणि दुसर्‍याच एखाद्या जागी घातपात घडवायचे असे कारस्थान तर कोणी रचत नाही ना हेसुद्धा पाहावे लागेल. राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात परिस्थिती इतकी नाजूक आहे की, लहानशा अफवेनेसुद्धा राजशकट कोलमडून पडेल अशी भीती वाटावी. लोकांची मने कमालीची अस्थिर बनली आहेत. देशाचे जवान, लष्करी तळे जिथे सुरक्षित नाहीत तिथे आम्हा पामरांच्या सुरक्षेचे काय? असा प्रश्‍न लोकांच्या मनात आलाच असेल तर ते चुकीचे ठरू नये.-'मराठा' मोर्च्यांची धडक बसत असल्याने अनेकांच्या खुर्च्या हलू लागल्या आहेत. महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल काय अशी भीती वाटू लागली आहे. त्यामुळे चार काळ्या वेषातील अतिरेकी घुसल्याची बोंब ठोकून लोकांचे लक्ष मूळ विषयावरून विचलित करण्यासाठी चार संशयित अतिरेक्यांची अदृश्य भुताटकी निर्माण केली की काय असेही लोकांना वाटू लागले. चार सशस्त्र बंदूकधार्‍यांना फक्त चार शाळकरी मुलांनी पाहिले व सर्व ह्यप्रौढह्ण मंडळी तेव्हा डोळ्यांस पट्ट्या बांधून वावरत होती असे तरी कसे म्हणता येईल?