शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

वाडा येथे स्नॅचर अटकेत

By admin | Updated: July 1, 2016 03:52 IST

महिलेच्या गळयातील दागिने चोरी प्रकरणातील (चेन स्रॅचिंग) दोन आरोपींना वाडा येथे पकडण्यात पालघरच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेला यश आले

पालघर : येथील महिलेच्या गळयातील दागिने चोरी प्रकरणातील (चेन स्रॅचिंग) दोन आरोपींना वाडा येथे पकडण्यात पालघरच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेला यश आले असून या यामुळे पालघर मधील स्नॅचींगचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.जिल्हयातील पाघर, नालासोपारा, वसई, विरार व बोईसर इ. शहरातील महिलांच्या गळयातील दागिने हिसकावून दुचाकीवरुन पळून (चैन स्रॅचिंग) जाण्याच्या प्रकारात मोठी वाढ झाली होती. त्यामुळे महिलांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले होते. धूम स्टाईलने येऊन दागिने चोरणाऱ्यांना अटक करण्यात स्थानिक पोलीस अपयशी ठरू लागल्यानंतर जिल्हा पोलीस अधिक्षक शारदा राऊत यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. अशोक होनमाने यांच्या टीमकडे या बाबतची जबाबदारी सोपविली होती. याप्रकरणात प्रकाश दशरथ धानवा (२०) रा. वाडा व मिलींद शंकर धानवा (१९ ) रा. वाडा या आरोपीना अटक करून त्यांच्याकडून मंगळसूत्रे, बोरमाळ, चेन असे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे आहे. चौकशीमध्ये आरोपींचा १९ चेन स्रॅचिंगमध्ये सहभाग असल्याचे उघडकीस आले आहे. या कामगिरीत सहा. पो. नि. प्रशांत लांगी, पो. उप. नि. हितेंद्र विचारे, सचिन चव्हाण, महादेव वेदपाठक, शिवानंद सुतनासे, हवालदार प्रदिप पवार, संदीप मोकल, मंगेश चव्हाण, शंकर दळवी, मनोज मोरे, सचीन दोरकर, प्रवीण पाटील इ. अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. यामुळे आता अन्य ठिकाणी झालेल्या अशाच प्रकारच्या गुन्ह्यांची उकल होण्यास मदत होण्याची शक्यता या पथकाने वर्तविली आहे. (प्रतिनिधी) >१९ गुन्हे आले उघडकीसआरोपींनी विरार पोलीस स्थानकांतर्गत सात, तुळींज पोलीस स्थानकांतर्गत सात, अर्नाळा पोलीस स्थानकांतर्गत दोन, पालघर पोलीस स्थानकांतर्गत दोन तर डहाणू तालुक्यातील एक गुन्हा उघडकीस आला आहे. आरोपी कडून ११ लाख ११ हजार ४६५ रूपयांच्या सोन्याच्या दागिन्यांसह गुन्हयासाठी वापरलेली मोटर सायकल देखील पोलीसांनी जप्त केली आहे. तपासाअंती आणखीही मुद्देमाल हाती लागण्याची शक्यता आहे.