शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकारांवर हल्ला करणारे अटकेत

By admin | Updated: March 2, 2017 02:59 IST

अनधिकृत इमारत सील करण्याचे काम सुरू असताना त्याचे वृत्त संकलन करणाऱ्या पत्रकारांवर हल्ला झाल्याचा प्रकार मंगळवारी दिघा येथे घडला

नवी मुंबई : अनधिकृत इमारत सील करण्याचे काम सुरू असताना त्याचे वृत्त संकलन करणाऱ्या पत्रकारांवर हल्ला झाल्याचा प्रकार मंगळवारी दिघा येथे घडला होता. याप्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, अद्यापही २५ ते ३० जण पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. परंतु घटनेवेळी उपस्थित पोलिसांकडे मदत मागूनही ती वेळेवर न मिळाल्यानेच आपल्यावर हल्ला झाल्याचा आरोप जखमी महिला पत्रकाराने केला आहे.न्यायालयाच्या आदेशानंतर दिघा येथील चार अनधिकृत इमारतींवर मंगळवारी जप्तीची कारवाई सुरू होती. प्रत्यक्षात मात्र त्याठिकाणच्या रहिवाशांनी केलेल्या विरोधामुळे केवळ दोनच इमारतींना सील ठोकण्यात आले असून उर्वरित दोन इमारतींवर पुढील दोन दिवसांत जप्तीची कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, दुर्गामाता व अवधूत धाया या दोन इमारतींवर जप्तीची कारवाई सुरू असताना, वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकार स्वाती नाईक ह्या लगतच्या इमारतीच्या छतावरून कॅमेरामन संदीप भारती यांच्यासह चित्रीकरण करत होत्या. त्यांना पाहताच उपस्थित जमावापैकी एका गटाने त्यांच्यावर दगडफेक करण्याला सुरवात केली. यामुळे स्वाती नाईक व संदीप भारती यांनी इमारतीबाहेर पळ काढण्याचा प्रयत्न केला असता, काही जण इमारतीमध्ये घुसून त्यांचा शोध घेवू लागले. पर्यायी दोघा पत्रकारांनी त्याच इमारतीमधील एका घरात लपून स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान त्यांनी आपल्यावर हल्ला करण्यासाठी २५ ते ३० जणांचा जमाव येत असल्याची माहिती कारवाईच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याला दिली. परंतु त्यांनी मदतीऐवजी ‘तुम्ही त्याठिकाणी गेलाच कशाला’ असा उलट प्रश्न करत प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. अखेर त्या जमावाने पत्रकार लपलेल्या घराचा शोध घेवून तिथल्या सामानाची तोडफोड करत दोघांनाही गंभीर मारहाण केली. यामध्ये संदीप भारती हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मुंबईत खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर स्वाती नाईक यांनाही दुखापत झाली आहे. या हल्ल्याप्रकरणी रबाळे पोलिसांनी मंगळवारी रात्री तिघांना अटक केली आहे. अल्लाउद्दीन अन्सारी, मनीष भागणे व नारायण पवार अशी त्यांची नावे आहेत. ते अमृतधाम इमारतीमधील रहिवासी असून या इमारतीवर देखील जप्तीची कारवाई होणार आहे. त्यांना हल्ला करण्यासाठी प्रवृत्त करण्यामागे राजकीय हात असल्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे या हल्ल्याचा सखोल तपास व्हावा अशी मागणी सर्व पत्रकारांनी केली आली आहे. शिवाय जमावाकडून पत्रकारांवर झालेला हल्ला यशस्वी होण्याला पोलीस कारणीभूत असल्याचाही आरोप होत आहे. तर घटनेनंतरही नवी मुंबईचे पोलीस आयुक्त अथवा उपआयुक्त यांच्यापैकी कोणीच साधी चौकशी देखील केली नसल्याचीही खंत स्वाती नाईक यांनी व्यक्त केली आहे. यावरून दोघा पत्रकारांवर जीवघेणा हल्ला होवूनही पोलिसांना गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. (प्रतिनिधी)