शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांवरील हल्ल्यांचे सत्र सुरूच

By admin | Updated: September 7, 2016 05:59 IST

पोलिसांवरील हल्ल्यांचे सत्र सुरूच असून, मंगळवारी हेल्मेट न घातलेल्यांवर कारवाई करणाऱ्या एका महिला पोलिसाला विलेपार्ले परिसरात शिवीगाळ करत अमानुषपणे मारहाण करण्यात आली.

मुंबई : पोलिसांवरील हल्ल्यांचे सत्र सुरूच असून, मंगळवारी हेल्मेट न घातलेल्यांवर कारवाई करणाऱ्या एका महिला पोलिसाला विलेपार्ले परिसरात शिवीगाळ करत अमानुषपणे मारहाण करण्यात आली. या प्रकरणी भाऊ - बहिणीला विलेपार्ले पोलिसांनी अटक केली. तर लालबागचा राजा येथे बंदोबस्तासाठी असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याला येथील कथित कार्यकर्त्याने धक्काबुक्की करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली. विलेपार्ल्यातील घटनेत पोलीस शिपाई प्रियांका खोत (३०) जखमी झाल्या आहेत. मंगळवारी सकाळी विलेपार्लेच्या सुभाष रोड परिसरात विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई सुरू होती. तेथे त्या कर्तव्य बजावत होत्या. त्याच दरम्यान आरती सुरेश पाटलेकर (२७) ही तरुणी तिच्या स्कूटीवर बसून आली. तिने हेल्मेट न घातल्याने खोत यांनी तिला हटकले. त्या वेळी या दोघांमध्ये वाद सुरू झाला. तेव्हा पाटलेकर हिने खोत यांच्या श्रीमुखात भडकावली. इतकेच नव्हे, तर नंतर तिने खोत यांच्या पोटात लाथ मारली. त्यात त्या खाली कोसळल्या. याच दरम्यान पाटलेकरने तिचा मोठा भाऊ सुदर्शन यालाही बोलावून घेतले. त्याने खोत यांना ‘तुम्हाला बघून घेईन’ अशी धमकी दिली. ही बाब विलेपार्ले पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत या बहीण-भावास ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. खारमध्ये विलास शिंदे यांना अशाच प्रकारे मारहाण करण्यात आली होती. ज्यात गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. तर लालबागचा राजा येथे बंदोबस्तासाठी असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्यास सोमवारी दुपारी मंडळाच्या कार्यकर्त्याने धक्काबुक्की करत मारहाण केली. काळाचौकी पोलिसांनी या प्रकरणी लालबागचा राजाच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.विक्रोळी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक रेखा खजुरे या लालबागचा राजा येथे कर्तव्य बजावत होत्या. दुपारी एकच्या सुमारास त्या ठिकाणी पोहोचलेल्या सागर मंगशे रहाटे (३०) याने लालबागच्या प्रवेशद्वारातून जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. या वेळी महिला पोलीस अधिकारी खजुरे यांनी रहाटेला आत घुसण्यास विरोध केला. रहाटे याने लालबाग राजा मंडळाचा कार्यकर्ता असल्याचे सांगून महिला पोलिसाला दमदाटी करत धक्काबुक्की केली. या हल्ल्यात खजुरे जखमी झाल्या.महिला पोलीस अधिकारी खजुरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून काळाचौकी पोलिसांनी आरोपी रहाटेवर भादंवि कलम ३५३, ३३२ आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. रहाटे हा काळाचौकी परिसरातील गणेशनगर इमारतीमध्ये राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले.