शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
धक्कादायक! डीजेच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
3
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
4
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
5
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
6
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
7
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
8
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
9
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
10
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
11
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
12
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
13
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
14
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
15
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
16
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
17
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
18
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
19
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे

असा झाला पानसरेंवर हल्ला...

By admin | Updated: February 17, 2015 01:44 IST

गोविंद पानसरे व त्यांची पत्नी उमा हे दोघे नेहमी सकाळी साडेसहाच्या सुमारास फिरायला बाहेर पडतात. सोमवारी ते थोडे उशिरा साडेसातच्या सुमारास फिरायला बाहेर पडले.

कोल्हापूर: गोविंद पानसरे व त्यांची पत्नी उमा हे दोघे नेहमी सकाळी साडेसहाच्या सुमारास फिरायला बाहेर पडतात. सोमवारी ते थोडे उशिरा साडेसातच्या सुमारास फिरायला बाहेर पडले. फिरून ते दोघे गप्पा मारत घरी येत असताना चंपालाल ओसवाल यांच्या बंगल्यासमोर येताच पाठीमागून मोटारसायकलवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी खाली उतरून पाठीमागून व समोरून रिव्हॉल्व्हरमधून पानसरे यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यामध्ये एक गोळी सरस्वती चुनेकर विद्यामंदिरच्या संरक्षण भिंतीला धडकली तर दोन गोळ्या पानसरे यांच्या छातीमध्ये व एक खांद्यामधून आरपार होऊन तोंडाच्या हनुवटीला घासून गेली. डोळ्यासमोर पतीवर झालेल्या हल्ल्याने उमा या जमिनीवर कोसळल्या. यावेळी त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्या बेशुद्ध पडल्या. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले. घटनेची माहिती ओसवाल यांनी फोनवरून पोलीस नियंत्रण कक्षास दिली. काही क्षणांतच घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल, शहर पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे, करवीचे पोलीस उपअधीक्षक अमर जाधव, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल देशमुख, राजारामपुरीचे पोलीस निरीक्षक अमृत देशमुख, लक्ष्मीपुरीचे धन्यकुमार गोडसे, जुना राजवाड्याचे दिनकर मोहिते, करवीरचे दयानंद ढोमे, शाहूपुरीचे अरविंद चौधरी आदींसह पोलिसांची पथके दाखल झाली. त्यांच्यापाठोपाठ अग्निशामक दलाचे जवानही घटनास्थळी आले. घटनेचे गांभीर्य ओळखून हल्लेखोर जिल्'ांतून बाहेर पडू नये यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. शर्मा यांनी वायरलेसवरून जिल्'ात कडेकोट नाकाबंदीचे आदेश दिले. विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासासाठी मार्गदर्शन केले.मुख्यमंत्र्यांनी घेतली माहिती पानसरे दाम्पत्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्याकडून फोनवर घेतली. यावेळी त्यांनी डॉ. शर्मा यांना हल्लेखोरांचा सर्व पातळ्यांवर शोध घेण्याच्या सूचना केल्या.घटनास्थळाचा पंचनामाघटनास्थळावर पोलिसांना पाच पुंगळ्या मिळाल्या तसेच रक्ताचे व मातीचे नमुनेही पोलिसांनी यावेळी घेतले. हल्लेखोर काही पुरावा सोडून गेले आहेत का हे पाहण्यासाठी घटनास्थळाचा परिसर पोलिसांनी पिंजून काढला. पानसरे दाम्पत्यास पहिल्यांदा पाहिले तसेच शेजारील लोकांचे जबाब पोलिसांनी जाग्यावरच घेतले.