शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमविवाह करणाऱ्या जोडप्यावर हल्ला

By admin | Updated: May 13, 2016 04:00 IST

आपल्या मुलीने भावकीतीलच एकाशी पळून जाऊन प्रेमविवाह केला म्हणून मुलीकडच्यांनी केलेल्या हल्ल्यात जोडप्यासह पाच जखमी झाले. चार वर्षांपूर्वी लग्न केल्यानंतर हे जोडपे प्रथमच यात्रेसाठी गावात आले होते.

सातारा : आपल्या मुलीने भावकीतीलच एकाशी पळून जाऊन प्रेमविवाह केला म्हणून मुलीकडच्यांनी केलेल्या हल्ल्यात जोडप्यासह पाच जखमी झाले. चार वर्षांपूर्वी लग्न केल्यानंतर हे जोडपे प्रथमच यात्रेसाठी गावात आले होते. सध्या गाजत असलेल्या ‘सैराट’ चित्रपटातील कथानकासारखा थरार सातारा तालुक्यातील गजवडीत बुधवारी मध्यरात्री घडला.गजवडी (ता. सातारा) येथील विनायक कदम याने गावातीलच उषा हिच्याशी २०१२ मध्ये प्रेमविवाह केला. भावकीत लग्न झाल्याने उषाकडील मंडळी चिडून होती. लग्न झाल्यानंतर विनायक कधीच गावाला आला नाही. लग्नाला चार वर्षे झाली. मुलगाही झाला. आता सगळ्यांचाच राग मावळला असेल, अशी भावना घेऊन ग्रामदैवताच्या पायावर मुलाला घालण्यासाठी विनायक यंदा पहिल्यांदाच गावी आला. जत्रेनिमित्त गजवडीमध्ये अवघे गाव येथे जमा झाले होते. रात्री साडेदहाच्या सुमारास विनायकच्या घराकडे हातात कुऱ्हाड, दांडकी, गज घेऊन मुलीकडची मंडळी येत असल्याचे विनायकचे वडील शंकर कदम यांनी पाहिले. प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तातडीने मुख्य लोखंडी दरवाजा आतून बंद करून घेतला. संतप्त झालेल्या या मंडळींनी दारावर पहार आणि दगड मारून तो तोडण्याचा प्रयत्न केला. पुढचे दार तुटत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी मागच्या लाकडी दाराकडे मोर्चा वळविला. मागचे दार तोडल्यानंतर विनायकचे वडील पुढे धावले. त्यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार झाल्याने खोलीत रक्ताच्या चिळकांड्या उडल्या. ते गंभीर जखमी झाले. घरात असलेल्या विनायक आणि उषा यांच्यासह सर्वांना त्यांनी बेदम मारहाण केली. पोलिस पाटील अमन पटेल यांनी तातडीने तालुका पोलिस ठाण्यात माहिती दिली. जखमी शंकर वामन कदम, पार्वती शंकर कदम, दिनकर वामन कदम, विनायक शंकर कदम आणि सुनंदा शंकर कदम यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.याप्रकरणी मुंबई पोलिसांत काम करणारा काका दिनकर नामदेव कदम, शंकर नामदेव कदम, लता शंकर कदम, अनिता दिनकर कदम, अश्विन शंकर कदम यांना अटक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)