तलासरी : तालुक्यातील कोचाई वडीपाडा येथे पिसाळलेल्या कुत्र्याने आठ वर्षीय शाळकरी मुलावर हल्ला करून त्यास गंभीर जखमी केले पिसाळलेला हा कुत्रा या भागात फिरत असून त्याने गेल्या आठ दिवसात अनेकावर हल्ला करून जखमी केले आहे. कोचाई वडीपाडा येथील वैभव वसंत हाडल वय आठ वर्षे हा इयत्ता तिसरीत शिकणारा मुलगा शाळेतून घरी येत असतांना पिसाळलेल्या कुत्र्याने त्याच्यावर हल्ला करून त्यास गंभीर जखमी केले या वेळी गावकरी धावून आल्याने वैभवची कुत्र्याच्या तावडीतुन सुटका झाली. या वेळी तात्काळ वैभवाला तलासरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करून उपचार केले. पिसाळलेला कुत्रा या भागात फिरत असल्याने गावकरी आपल्या मुलांना शाळेत पाठवायलाही घाबरत आहेत या कुत्र्याने अनेकांवर हल्ला केल्याने त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.(वार्ताहर)
पिसाळलेल्या कुत्र्याचा शाळकरी मुलावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2016 03:47 IST