शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कैद्याचा अधिकारी, कॉन्स्टेबलवर हल्ला

By admin | Updated: March 3, 2017 05:45 IST

एका कैद्याने तुरुंग अधिकाऱ्यासह कॉन्स्टेबलवर धारदार शस्त्रासारख्या स्टीलच्या पट्टीने हल्ला केल्याची घटना गुरुवारी सकाळी कारागृहात घडली.

ठाणे : बलात्काराच्या आरोपाखाली ठाणे मध्यवर्ती कारागृहात बंदीवान असलेल्या एका कैद्याने तुरुंग अधिकाऱ्यासह कॉन्स्टेबलवर धारदार शस्त्रासारख्या स्टीलच्या पट्टीने हल्ला केल्याची घटना गुरुवारी सकाळी कारागृहात घडली. यामध्ये अधिकारी आणि कॉन्स्टेबल जखमी झाले असून याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.तुरुंग अधिकारी संभाजी पिसे आणि कॉन्स्टेबल सुभाष राबडे अशी जखमींनी नावे आहे. नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी ९.५० च्या सुमारास पिसे हे गुरुवारी सकाळी कारागृहातील सुरक्षा क्रमांक २ (बॅरेक) येथे राउंड घेत होते. या वेळी अचानक हल्लेखोर अरमान खानने (२९) धावून येत, हातातील पट्टीने त्यांच्यावर हल्ला केला. याचदरम्यान, मदतीसाठी धावून गेलेल्या कॉन्स्टेबल राबडे यांच्यावर त्याने हल्ला केला. यामध्ये दोघे जखमी झाले असून त्याला मोक्कांतर्गत बंदीवान असलेल्या गोपाळ शेट्टीने भडकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. पिसे यांनी ठाणेनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी तपास करण्यासाठी अरमानचा ताबा मिळावा, अशी मागणी न्यायालयाकडे करणार आहे. तर, अरमान याच्यावर मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात पोक्सो अ‍ॅक्टसह बलात्काराचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विलास शिंदे यांनी दिली. (प्रतिनिधी)आधीही वादबलात्काराचा आरोप असलेल्या अरमान आणि चोरीचा आरोप असलेल्या शेट्टी याच्यासह इतर दोघांना मुंबईतील आॅर्थर जेलमधून जुलै २०१६ मध्ये ठाण्यातील कारागृहात रवानगी केली. ही रवानगी मे २०१६ मध्ये त्या कारागृहात झालेल्या वादातून केली होती. तेव्हापासून अरमान येथे कच्चा कैदी म्हणून शिक्षा भोगत आहे. नोव्हेंबर महिन्यात अरमानचा चित्रपट पाहण्यावरून एकाशी वाद झाला. तेव्हापासून त्याला कारागृहातील वेगळ्या ठिकाणी ठेवले होते. बुधवारीच त्याला सुरक्षा क्रमांक २ येथे इतर कै द्यांसोबत ठेवण्यात आले आहे.