शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

मधमाशांचा पर्यटकांवर हल्ला, अजिंठा लेणी टी पॉइंटवरील घटना

By admin | Updated: June 26, 2017 22:44 IST

सलग सुट्या आल्याने जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत शनिवार, रविवारप्रमाणेच सोमवारीही पर्यटकांची प्रचंड गर्दी उसळली, परंतु दर सोमवारी

 शिवाजी महाकाळ/ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. २६ -  सलग सुट्या आल्याने जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत शनिवार, रविवारप्रमाणेच सोमवारीही पर्यटकांची प्रचंड गर्दी उसळली, परंतु दर सोमवारी अजिंठा लेणी बंद राहात असल्याने येथे आलेल्या पर्यटकांचा चांगलाच हिरमोड झाला. त्यातच टी पॉइंटवर सोमवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास चवताळलेल्या मधमाशांनी जवळपास शंभरावर पर्यटकांवर हल्ला चढविल्याने त्यांना पळता भुई थोडी झाली.शनिवारपासूनच अजिंठालेणीत पर्यटकांची गर्दी वाढत आहे. दोन दिवसात जवळपास दहा हजार पर्यटकांनी अजिंठालेणीस भेट दिली, तर सोमवारी रमजान ईदची सुट्टी असल्याने सकाळी दहा वाजेपासूनच जगप्रसिद्ध अजिंठालेणीत येणाऱ्या पर्यटकांची फर्दापूर अजिंठालेणी टी पॉइंटवर प्रचंड गर्दी उसळली होती. सकाळी साडेअकरा वाजेपर्यंतच येथील दुचाकीकरीता उभारलेले वाहनतळ हाऊसफुल्ल झाल्याचे दिसून आले.शनिवार रविवार व सोमवार या तीन दिवसात अंदाजे पंधरा हजार पर्यटकांनी भेट दिली. लेणी बंद असल्याने हिरमोडसोमवारी लेणी बंद असल्याने हिरमोड झालेल्या पर्यटकांनी टी पॉइंट येथील बाल उद्यान व व्यापारसंकुलनातच सुट्टीचा आनंद लुटण्याचा निर्णय घेतला, मात्र त्यात कुणीतरी येथील आग्या मोहोळाच्या पोळ्याला दुपारी बारा वाजेच्या सुमारास दगड मारला. यामुळे चवताळलेल्या मधमाशांनी बालउद्यान, व्यापार संकुल, वाहनतळ परिसरातील पर्यटक, लहान मुले, स्थानिक व्यावसायिकांवर हल्ला चढविल्याने एकच धावपळ उडाली. सर्वजण सैरावैररा धावत सुटले, पण मधमाशांनी त्यांचा पिछा सोडला नसल्याने पर्यटकांना पळता भुई थोडी झाली. १५ मिनिटातच परिसर निम्याहून अधिक रिकामा झाला. काही व्यापाऱ्यांनी कडूलिंबाचा पाला जाळून धूर निर्माण करुन मधमाशांना पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत चवताळलेल्या मधमाशांनी शेकडो पर्यटकांना चांगलेच फोडून काढले होते.