शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

कोर्टाच्या आवारात आरोपीचा माफीच्या साक्षीदारावर हल्ला

By admin | Updated: June 9, 2017 06:05 IST

एका आरोपीने आपल्या सहकाऱ्यावर लोखंडी पट्टीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना गुरुवारी दुपारी दक्षिण मुुंबईतील सत्र न्यायालयाच्या आवारात घडली

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : खुनाच्या खटल्यात माफीचा साक्षीदार बनल्याचा राग मनात धरून एका आरोपीने आपल्या सहकाऱ्यावर लोखंडी पट्टीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना गुरुवारी दुपारी दक्षिण मुुंबईतील सत्र न्यायालयाच्या आवारात घडली. मात्र बंदोबस्तावरील पोलिसांनी प्रसंगावधान दाखविल्याने हा हल्ला निष्फळ ठरला. या घटनेमुळे पक्षकार व वकिलांमुळे गजबजलेल्या न्यायालयाच्या आवारात काहीवेळ खळबळ उडाली.उदय पाठक असे हल्लेखोर कैद्याचे नाव असून त्याला कुलाबा पोलिसांनी अटक केली आहे. त्याने कल्पेश पटेलच्या डोक्यात आणि मानेवर लोखंडी पट्टीने वार केले. मात्र पोलिसांनी त्याला वेळीच बाजूला काढल्याने तो बचावला. २०११ साली विरार व्हिलेज येथे झालेल्या चार जणांच्या हत्याकांडामध्ये उदय पाठक हा मुख्य आरोपी असून त्यामध्ये कल्पेश पटेलही सहआरोपी आहे. पोलिसांनी त्यांच्यावर दोषारोप पत्र दाखल केले आहे. दोघेजण सध्या आर्थर रोड कारागृहात आहेत. पटेल हा या खटल्यात माफीचा साक्षीदार झाल्याने उदय पाठक त्याच्यावर चिडून होता. सत्र न्यायालयात सुनावणी असल्याने गुरुवारी दोघांना पोलिसांनी स्वतंत्र वाहनातून कोर्टात आणले. कोर्ट रुम नं. १७ मध्ये त्यांना नेत असताना दोघे समोरासमोर आले. त्यावेळी पाठकने आपल्यासमवेत कापडात दडवून आणलेल्या लोखंडी पट्टीने त्याच्या डोक्यावर व मानेवर वार केले. मात्र कल्पेशच्या बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांचे त्याकडे लक्ष गेले. त्यांनी त्याला बाजूला ओढले. त्यावेळी पाठकने पोलिसांनाही शिवीगाळ करत पटेलला मारण्याची धमकी दिली. कल्पेशच्या आरडाओरडीमुळे आणि आकस्मितपणे घडलेल्या या प्रकारामुळे न्यायालयाच्या आवारात काहीवेळ खळबळ उडाली. पोलिसांनी पाठकला पकडून तातडीने कुलाबा पोलीस ठाण्यात नेले. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, सरकारी कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.