शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

एटीएसच्या पुण्यातील अधिकाऱ्याला धमकी

By admin | Updated: January 14, 2016 00:37 IST

‘इसिस’च्या जाळ्यात अडकलेल्या तरुणांचे मत परिवर्तन करणाऱ्या पुणे दहशतवादी विरोधी पथकाचे (एटीएस) कार्यालय व तेथील उपअधीक्षक भानुप्रताप बर्गे यांना ठार मारण्याची धमकी देणारे

मुंबई : ‘इसिस’च्या जाळ्यात अडकलेल्या तरुणांचे मत परिवर्तन करणाऱ्या पुणे दहशतवादी विरोधी पथकाचे (एटीएस) कार्यालय व तेथील उपअधीक्षक भानुप्रताप बर्गे यांना ठार मारण्याची धमकी देणारे पत्र मुंबई पोलीस आयुक्तांना मिळाले आहे. पत्रावर कोणत्याही संघटनेचे नाव नसलेतरी ‘इसिस’च्या समर्थकांकडून ते आल्याची शक्यता आहे. इसिस या अतिरेकी संघटनेच्या संपर्कात असलेल्या पुण्यातील एका वैद्यकीय महाविद्यालयातील तरुणीचे एटीएसच्या पुणे विभागाने नुकतेच मत परिवर्तन करुन तिला कुटुंबीयांच्या ताब्यात दिले होते. अशाच प्रकारे धार्मिक भूलथापांना बळी पडून तरुण-तरुणींनी अतिरेकी संघटनांच्या संपर्कात राहू नये, यासाठी पुणे एटीएस पथक विशेष कार्यशाळा, उपक्रम राबवित आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस आयुक्त अहमद जावेद यांच्या नावे चार दिवसांपूर्वी मुख्यालयात एक निनावी पत्र आले. त्यामध्ये पुणे एटीएस कार्यालय व तेथील भानूप्रताप बर्गे हे आमच्या मोहिमेमध्ये विघ्न आणत आहेत, त्यांना योग्य धडा शिकवू, कार्यालय तसेच बर्गे यांचे कुटुंबीय बॉम्बने उडवून देवू, अशी धमकी देण्यात आली आहे. पत्राच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त जावेद अहमद यांनी तातडीने शहानिशा सुरू करण्याचे आदेश दिले. त्याचप्रमाणे एटीएस व पुणे पोलीस आयुक्तांना कळविण्यात आले आहे. प्रकरणाचा तपास पुण्यातील विशेष शाखेचे उपायुक्त पाठक यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. बर्गे यांच्या निवासस्थानी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. हे पत्र कोठून आले, कोणी लिहिले आहे, याचा तपास सुरू केल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)धमक्यांना भीक घालत नाहीदहशतवादी कारवाया, घातपाती कृत्यांना आळा घालण्याचे आपले प्रयत्न कसोशीने सुरू राहणार आहेत. आपण कोणाच्याही धमक्यांना भीक घालत नाही. आमच्याकडेही अद्यावत हत्यारे असून आम्ही सुसज्ज आहोत.- भानूप्रताप बर्गे, उपअधीक्षक, पुणे एटीएस