शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

एटीएस मुंबईला आणखी एक उपमहानिरीक्षकपद

By admin | Updated: March 9, 2017 01:55 IST

वाढती देशविघातक कृत्ये व अतिरेकी कारवायांना प्रतिबंध घालण्यासाठी कार्यरत असलेल्या दहशतवादविरोधी पथकामध्ये (एटीएस) मुंबई विभागासाठी आता उपमहानिरीक्षक

- जमीर काझी,  मुंबई

वाढती देशविघातक कृत्ये व अतिरेकी कारवायांना प्रतिबंध घालण्यासाठी कार्यरत असलेल्या दहशतवादविरोधी पथकामध्ये (एटीएस) मुंबई विभागासाठी आता उपमहानिरीक्षक (डीआयजी)पद देण्यात आले आहे. पुण्यात कार्यरत असलेले हे पद मुंबईला स्थलांतरित करण्यात आले असून, केंद्रीय गुप्तचर यंत्रणा व अन्य राज्यातील एटीएसशी समन्वयाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.एटीएसचे मुंबईतील विशेष महानिरीक्षकपद गेल्या आठ महिन्यांपासून रिक्त आहे. त्यामुळे एटीएसप्रमुखावर दिल्लीतील बैठकांचा भार वाढत आहे. त्यामुळे पुण्यातील ‘डीआयजी’चे पद मुंबईला हलविण्यात आले आहे, असे गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले. गेल्या वर्षी ११ आॅगस्टला एटीएसचे विशेष महानिरीक्षक निकेत कौशिक यांची रेल्वे पोलीस आयुक्तपदी बदली झाल्यापासून हे पद रिक्त आहे. त्यामुळे एटीएसचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांना अनेकवेळा दिल्लीत होणाऱ्या गुप्तचर यंत्रणांच्या बैठकींना जावे लागे, त्याचप्रमाणे आयजीच्या कामाची जबाबदारीही त्यांच्यावर पडली होती. त्यामुळे त्यांच्या कामावर परिणाम होऊ लागल्याने अनेकवेळा पुण्यातील उपमहानिरीक्षक सुहास वारके यांना दिल्लीतील बैठका, एटीएसच्या कामाचा आढावा घेण्यासाठी पाठविण्यात येऊ लागले. मात्र पुण्यातून हे काम हाताळणे अवघड होत असल्याने हे पद मुंबईला स्थलांतर करण्याचा प्रस्ताव गृह विभागाकडे पाठविण्यात आला होता. त्याला हिरवा कंदील दिला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.डीआयजींवर असेल ही जबाबदारीउपमहानिरीक्षकांना आता एटीएसच्या तपासाचे पर्यवेक्षण करणे, अन्य राज्यातील एटीएस/ गुप्तचर यंत्रणा यांच्याशी समन्वय साधणे; तसेच दिल्लीतील समन्वय बैठकामध्ये हजर राहावे लागणार आहे. आयजीचेपद भरण्यात आल्यानंतर या कामाची विभागणी केली जाईल किंवा आवश्यकता वाटल्यास पुन्हा डीआयजीचे पद पुण्याला हलविण्यात येईल, असे सांगण्यात आले.दहशतवादविरोधी पथकासाठी अपर महासंचालक, आयजी व डीआयजीचे प्रत्येकी एक पद मंजूर असून, त्याशिवाय मुंबई व औरंगाबाद विभागात एक उपायुक्त आणि गुप्त वार्तासाठी एका तांत्रिक पदासह दोन अधीक्षक पदे मंजूर आहेत. पैकी आयजीचे पद सात महिन्यांपासून रिक्त असल्याने एटीएसप्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांच्यानंतर उपमहानिरीक्षक सुहास वारके हे ज्येष्ठ अधिकारी आहेत. सुमारे साडेतीन वर्षे राष्ट्रीय तपास यंत्रणेत (एनआयए) प्रतिनियुक्तीवर काम केले असून, मालेगाव बॉम्बस्फोट २००८ प्रकरणात अधिक सक्रिय राहू नये, अशी त्यांनी आपल्याला सूचना केल्याचा आरोप सरकारी वकील रोहिणी सालियन यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रकाद्वारे केला होता. त्यानंतर त्यांची पुन्हा महाराष्ट्र केडरमध्ये बदली करण्यात आली.