शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांत ‘अ‍ॅट्रॉसिटी’चे सहा हजार गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 06:16 IST

राज्यात अनुसूचित जाती जमातीच्या अत्याचार प्रतिबंधक कलमांन्वये (अ‍ॅट्रॉसिटी) दाखल गुन्ह्यांचा आलेख जवळपास कायम राहिला आहे.

जमीर काझी  मुंबई : राज्यात अनुसूचित जाती जमातीच्या अत्याचार प्रतिबंधक कलमांन्वये (अ‍ॅट्रॉसिटी) दाखल गुन्ह्यांचा आलेख जवळपास कायम राहिला आहे. दरवर्षी दोन हजारांवर गुन्हे दाखल असून गेल्या तीन वर्षांत तब्बल साडे सहा हजारांवर गुन्हे घडले आहेत. त्यापैकी बहुतांश खटले अद्याप न्यायालयात प्रलंबित आहेत.अ‍ॅट्रॉसिटी गुन्ह्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आरोपींना अटक करण्याबाबत नुकत्याच दिलेल्या निकालाबाबत देशभरात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांकडून होत आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने जानेवारी २०१५ ते जानेवारी २०१८ या कालावधीत राज्यातील प्रत्येक पोलीस घटकात दाखल गुन्ह्यांचा आढावा घेतला आहे. तब्बल ६,८१९ गुन्हे घडले आहेत.राज्यात २०१५मध्ये अ‍ॅट्रॉसिटीचे एकूण २३०४ गुन्हे दाखल झाले होते. त्यामध्ये सर्वाधिक १३७ घटना या यवतमाळ जिल्ह्यातील आहेत. त्याखालोखाल अहमदनगर (११६) व पुणे ग्रामीण (११४) गुन्हे दाखल होते. २०१६ व २०१७मध्ये राज्यातील अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यांमध्ये फारसा फरक पडलेला नाही.या दोन वर्षांत अनुक्रमे २१५५ व २१५२ गुन्हे दाखल झाले आहेत. यापैकी काही गुन्ह्यांचा तपास अद्याप अपूर्ण आहे, तर अन्य खटले न्यायालयात प्रलंबित आहेत.अपुरे मनुष्यबळअनुसूचित जाती जमातीसंबंधीचे गुन्हे अत्यंत गंभीर समजले जातात. त्यामुळे त्याचा तपास हा उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केला जातो. त्याचप्रमाणे या गुन्ह्यासंबंधी आढावा घेण्यासाठी मुख्यालयात विशेष महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाºयाच्या अंतर्गत विशेष विभाग आहे. मात्र, अपुरे मनुष्यबळ आणि कामाच्या अन्य ताणामुळे ही गंभीर प्रकरणे तपासाविना रखडल्याची परिस्थिती आहे.