शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅट्रॉसिटी कायदा कडक करावा

By admin | Updated: January 21, 2017 23:35 IST

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र प्रतिनिधित्व (आरक्षण) देण्यात यावे, या प्रमुख मागणीसह अ‍ॅट्रॉसिटीचा कायदा कडक करण्यात यावा, त्या

मुंबई : ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र प्रतिनिधित्व (आरक्षण) देण्यात यावे, या प्रमुख मागणीसह अ‍ॅट्रॉसिटीचा कायदा कडक करण्यात यावा, त्या अंतर्गत खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, ओबीसीसह सर्व जातींची जातीनिहाय जनगणना करून लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व (आरक्षण) देण्यात यावे आणि ओबीसीसाठी लावण्यात आलेली क्रिमिलेअरची जाचक अट रद्द करण्यात यावी, अशा अनेक मागण्यांसाठी धडकलेल्या बहुजन क्रांती मोर्चाने आझाद मैदान शनिवारी दुमदुमले.अ‍ॅट्रॉसिटीचा कायदा कडक करण्यात यावा, त्या अंतर्गत खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत. महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी कडक कायदा करण्यात यावा. झोपड्यांचे पुनर्वसन मुंबईतच करून एस.आर.ए. अंतर्गत ५०० चौरस फुटांचे घर देण्यात यावे. ओबीसीसह सर्व जातींची जातीनिहाय जनगणना करून लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व (आरक्षण) देण्यात यावे. ओबीसीसाठी लावण्यात आलेली क्रिमिलेअरची जाचक अट रद्द करण्यात यावी. यावे इत्यादी मागण्याही या वेळी करण्यात आल्या. बहुजन क्रांती मोर्चामध्ये अनुसूचित जाती, जमाती, भटके विमुक्त जाती जमाती, ओबीसी, ख्रिश्चन, मुस्लीम, बौद्ध, लिंगायत, शीख, जैन इत्यादी समाजांचे बांधव मोठ्या संख्येने मोर्चात सामील झाले होते. (प्रतिनिधी)शासनाकडे विविध मागण्या सादरओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र प्रतिनिधित्व (आरक्षण) देण्यात यावे.बारा बलुतेदारांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र ‘आर्थिक विकास महामंडळ’ स्थापन करण्यात यावे.अल्पसंख्याक समुदायाच्या संरक्षणासाठी सांप्रदायिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा बनवण्यात यावा.एस.सी., एस.टी. आणि ओ.बी.सी.चा शासकीय नोकरीतील अनुशेष त्वरित भरून काढावा.शासकीय आणि निमशासकीय क्षेत्रातील वर्तमान कंत्राटी कामगारांना सेवेत कायम करत कंत्राटी पद्धत त्वरित रद्द करा.खासगी क्षेत्रातील कामाचे आठ तास निश्चित करून कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन द्या.कोळी समाजाच्या व्यवसायासाठी स्वतंत्र शासकीय शीतगृहे व इतर आवश्यक सोयी-सुविधा पुरवा.विस्थापितांना प्रकल्प घोषित करून त्यांच्या वारशांचे पुनर्वसन करा आणि त्यांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्या.