शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहात होतात वरिष्ठांकडूनच अत्याचार

By admin | Updated: July 13, 2017 05:12 IST

मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणानंतर राज्यातल्या कारागृहांतील गैरप्रकारांना वाचा फुटू लागली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणानंतर राज्यातल्या कारागृहांतील गैरप्रकारांना वाचा फुटू लागली आहे. कारागृहात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडून महिला अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण केले जात आहे. यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी करणारे पत्र एका जिल्ह्यातील कारागृह अधीक्षक पदावर कार्यरत महिला अधिकाऱ्याने लिहिले आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार नीलम गोऱ्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या चित्रा वाघ यांना या अधिकाऱ्याकडून तसे पत्र आले आहे. वरिष्ठांबाबत गंभीर स्वरूपाच्या तक्रारी असलेले एक पत्र मिळाले. सहीनिशी आलेल्या या पत्राची शहानिशा करण्याचा प्रयत्न केला असता सदर महिला अधिकाऱ्याने आपण तसे पत्र पाठविले नसल्याचे म्हटले आहे. या पत्रात कारागृह विभागातील काही बड्या अधिकाऱ्यांविषयी संशयास्पद व धक्कादायक बाबी नमूद केल्या गेल्या आहेत. त्यामुळे या पत्रातील आरोपांची पडताळणी होणे आवश्यक असल्याचे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. हे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविले असून, चौकशीची मागणी केल्याचे गोऱ्हे यांनी सांगितले. गोऱ्हे आणि चित्रा वाघ यांना आलेल्या पत्रात वरिष्ठ अधिकाऱ्याबाबत तक्रारी आहेत. कामात चुका दाखवून रिपोर्ट करण्याबाबतच्या धमक्या देत बळजबरीने शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे. त्यानंतर या अधिकाऱ्याची मध्यवर्ती कारागृहात बदली झाली; तेव्हा या अधिकाऱ्याने राजकीय वजन वापरून या महिलेचीही बदली मध्यवर्ती कारागृहात करवून घेतल्याचा आरोप पत्रात करण्यात आला आहे. माझ्या बायकोला कॅन्सर आहे. ती जास्त दिवस जगणार नाही, त्यानंतर आपण लग्न करू, असे अधिकाऱ्याने महिलेला सांगितले. आजपर्यंत कारागृह खात्यातील ६० ते ७० महिलांवर बलात्कार केला असल्याचा आरोप या पत्रात केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत संबंधावरून अन्य अधिकारीदेखील तशी मागणी करत. अजूनही बळजबरीने संबंध ठेवण्याचे प्रकार सुरू असून, त्याचा तपास व्हावा, अशी मागणी पत्रात केली आहे. सहीनिशी असलेले पत्र आपण लिहिलेच नसल्याची भूमिका सदर महिला अधिकाऱ्याने घेतली असली तरी पत्रातील आरोपांचे गंभीर स्वरूप पाहता संपूर्ण प्रकरणाचा तपास होणे गरजेचे असल्याचे गोऱ्हे म्हणाल्या.